PK Audio Chat Leaks : प्रशांत किशोर यांची कबुली; म्हणाले, TMCच्या सर्व्हेतही भाजपचा विजय. मोदी प्रचंड लोकप्रिय!

Prashant Kishor Audio Chat Leaks, Claims BJP Is Winning Bengal Elections

Prashant Kishor Audio Chat Leaks : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. तृणमूलला भाजपचे कडवे आव्हान मिळत असून तेथे डावे व काँग्रेस एकत्र लढूनही निष्प्रभ ठरलेले दिसत आहेत. अशातच ममता दीदींचे रणनीतीकार म्हणून काम करणारे प्रशांत किशोर यांच्या ऑडिओ चॅटमुळे खळबळ उडाली आहे. यात त्यांनी असा दावा केला आहे की, बंगालमध्ये तृणमूलविरुद्ध असंतोष असून भाजपचाच विजय होण्याची शक्यता जास्त आहे. प्रशांत किशोर या ऑडिओ चॅटमध्ये काही सुप्रसिद्ध पत्रकारांशी संवाद साधताना दिसत आहेत. Prashant Kishor Audio Chat Leaks, Claims BJP Is Winning Bengal Elections


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. तृणमूलला भाजपचे कडवे आव्हान मिळत असून तेथे डावे व काँग्रेस एकत्र लढूनही निष्प्रभ ठरलेले दिसत आहेत. अशातच ममता दीदींचे रणनीतीकार म्हणून काम करणारे प्रशांत किशोर यांच्या ऑडिओ चॅटमुळे खळबळ उडाली आहे. यात त्यांनी असा दावा केला आहे की, बंगालमध्ये तृणमूलविरुद्ध असंतोष असून भाजपचाच विजय होण्याची शक्यता जास्त आहे. प्रशांत किशोर या ऑडिओ चॅटमध्ये काही सुप्रसिद्ध पत्रकारांशी संवाद साधताना दिसत आहेत. या ऑडिओ चॅट सोशल मीडियावर व्हायरल असून ‘द फोकस इंडिया’ यांच्या सत्यतेची खात्री देत नाही.

काय म्हणाले प्रशांत किशोर?

पत्रकारांशी आपल्या स्मार्टफोनवर संवाद साधताना सीएम ममता बनर्जी यांचे निवडणूक रणनीतिज्ञ प्रशांत किशोर यांनी हे स्वीकारले की, तृणमूलच्या अंतर्गत सर्व्हेमध्येही भाजपचाच विजय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशांत किशोर यांनी मान्य केले की, ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध अँटी-इन्कम्बन्सी आहे. बंगालमधील दलितही भाजपलाच मत देतील.

 

दरम्यान, प्रशांत किशोर यांना या संवादादरम्यान हे माहिती नव्हते की, त्यांची चॅट पब्लिक आहे. ममता बनर्जींचे रणनीतिज्ञ प्रशांत किशोर असेही म्हणाले की, डावे, काँग्रेस आणि तृणमूलने परिस्थितीनुरूप मागच्या 20 वर्षांपासून मुस्लिमांचे तुष्टीकरण केले आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, हेच कारण आहे की, या तिन्ही पक्षांविरुद्ध तेथे संतापाची लाट आहे.

‘तृणमूलविरुद्ध बंगालमध्ये अँटी-इन्कम्बन्सी’

आपल्या चॅटमध्ये प्रशांत किशोर हे मान्य करताना दिसतात की, पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत, यात संशयाला जागाच नाही. पूर्ण देशात लोक त्यांना पसंत करतात. आपल्या या ओपन चॅटमध्ये ममता बॅनर्जी यांचे हे रणनीतिज्ञ म्हणाले की, तृणमूलविरुद्ध अँटी-इन्कम्बन्सी आहे, ध्रुवीकरण एक सत्य आहे, भाजपच्या निवडणूक यंत्रणेसाठी एससी व्होट एक फॅक्टर आहे.

पंतप्रधान मोदींसाठी मतांचे ध्रुवीकरण एक सत्य आहे. बंगालच्या लोकसंख्येच्या 27 टक्के एससी मतेही याचा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. मतुआ समुदायाची सर्व मते भाजपला जात आहेत. भाजपकडे ग्राउंड कॅडर आहे.

प्रशांत किशोर यांनी विचारले- इज इट ओपन?

प्रशांत किशोर यांना आपली चॅट सार्वजनिक झाल्याचे उशिरा लक्षात आले. क्लब हाऊसची चॅटरूम ओपन झालेली होती. प्रशांत किशोर यांचे म्हणणे तेथील पत्रकारच नाही तर मोठ्या संख्येने सर्वसामान्यही ऐकत होते. आपली चॅट ऐकली जात असल्याचे त्यांना लक्षात येताच त्यांनी विचारले की, ही रूम ओपन आहे काय?

प्रशांत किशोर यांच्या लीक चॅटवर भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लॉकेट चटर्जी म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारने जो भ्रष्टाचार केला आहे, त्यामुळेच तृणमूलचा पराभव होत आहे. त्याचाच पुरावा प्रशांत किशोर यांचे वक्तव्य आहे.

Prashant Kishor Audio Chat Leaks, Claims BJP Is Winning Bengal Elections

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात