पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु; ममतांचा हा गड भाजपचे भवितव्य ठरविणार!


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या चौथ्या टप्पाचं मतदान सुरु झाले आहे. या मतदानात 382 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद होणार आहे. आज 44 जागांसाठी मतदान सुरु झाले. WB Election 2021 Phase 4 Voting

चौथ्या टप्प्यातल्या मतदानाच्या प्रचारतोफा गुरुवारी (ता. 8 ) थंडावल्या. मतदानामध्ये उत्तर बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यातल्या 5 जागांसाठी, कूचबिहार जिल्ह्यातल्या 9 जागांसाठी तर दक्षिण बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या 10 जागा, हावडा जिल्ह्यातल्या 9 जागा आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे.



44 जागांमध्ये हायप्रोफाईल लढती

44 जागांमध्ये अनेक हायप्रोफाईल लढती होणार आहेत. यामध्ये सिंगूर विधानसभा येथे ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या सिंगूरमधून ममतांचे सहकारी बेचाराम मन्ना लढत आहेत. हावडा जिल्ह्यातल्याच शिबपूर विधानसभा मतदारसंघात माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी नशीब आजमवत आहे. हावडा मध्य मतदारसंघातून मंत्री अरुप राय निवडणूक लढवत आहेत. कूचबिहार जिल्ह्यातल्या  दिनहाटा मतदारसंघातून उदयन गुहा, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या टॉलिगंज मतदारसंघातून मंत्री अरुप विश्वास, बेहला पश्चिम मतदारसंघातून मंत्री पार्थ चॅटर्जी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भाजपकडून टॉलिगंज मतदारसंघातून केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, चुचुडा मतदारसंघातून खासदार लॉकेट चॅटर्जी, चंडीतलातून अभिनेता यश दासगुप्ता, जादवपूर मतदारसंघातून रिंकू नस्कर तर डोमजूर मतदार संघात टीएमसीचे नेते राजीव बॅनर्जी यांचं भवितव्य कैद होणार आहे.

केंद्रीय पथकाची मतदारसंघात गस्त

तीन टप्प्यांचा अनुभव बघता बंगालमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी केंद्रीय पथकाच्या तुकड्या दोन दिवसांपासून गस्त घालत आहेत. बंगालमध्ये दहशतीचं वातावरण असलं तरी मतदानाची टक्केवारी चांगली आहे.

WB Election 2021 Phase 4 Voting

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात