कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र काय सांभाळणार? नारायण राणे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल


माझे कुटुंब माझी जबाबदारी असताना कुटुंबातील सगळी लोकं, रूग्णालयात कसे? म्हणजे कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र व करोनाबाधित रूग्णांना कसं सांभाळणार? हे अपयश आहे. करोना हाताळायला हे सरकार कमी पडले आहे. केंद्राकडे का बोट दाखवता? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. What will a person who can’t take care of his family take care of Maharashtra? Narayan Rane’s attack on Uddhav Thackeray


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : माझे कुटुंब माझी जबाबदारी असताना कुटुंबातील सगळी लोकं, रूग्णालयात कसे? म्हणजे कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र व करोनाबाधित रूग्णांना कसं सांभाळणार? हे अपयश आहे. करोना हाताळायला हे सरकार कमी पडले आहे. केंद्राकडे का बोट दाखवता? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना, त्यावर उपाययोजना करायला हा महाराष्ट्र कमी पडला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत रूग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यूंची संख्या वाढत आहे. याचं गांभीर्य राज्य सरकारला नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. राज्यात डॉक्टर्स नाही, बेड्स नाही, नर्स नाही ही कोणाची जबाबदारी आहे? जसं माझं कुटुंबं माझी जबाबदारी, तर महाराष्ट्र तुमचं कुटुंबं असेल, तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणं. रूग्णांवर उपचार योग्यप्रकारे करणं, त्यांना बरं करणं ही तुमची तुमची जबाबदारी नाही का ? पिंजऱ्यात काय जाऊन बसत आहात, स्वत:ला लॉकडाउन करून घेतलं आहे. मातोश्रीच्या बाहेर पडत नाही मग को रोना होईल कसा?राणे म्हणाले, माझा प्रश्न आहे सचिन वाझेला मुंबईतून १०० कोटी जमा करायला सांगितले, हे आदेश केवळ अनिल देशमुख यांचे नाहीत. यामध्ये सगळे राज्याचे प्रमुख सहभागी आहेत. मग तुम्ही जमा केलेले पैसे, लसीसाठी का नाहीवापरत? ते कुठे जातात? कोणाकडे जातात? याबद्दल काहीतरी सांगा. मग बेड नाही व्हेंटिलेटर्स नाहीत असं सांगितलं जातं. वॉर्ड बॉय, नर्स, डॉक्टर्स यांची भरती कोणी करायची?

केंद्राकडे बोट दाखवून आपलं अपयश झाकायचं काम हे राज्य सरकार करत आहे. जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस जनतेचं शोषण करण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारचा सुरू आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप राणे यांनी केला.

What will a person who can’t take care of his family take care of Maharashtra? Narayan Rane’s attack on Uddhav Thackeray

 


हे ही वाचा

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!