लसीकरणाने रोखता येणार कोरोना , तज्ञांचा विश्वास ; तिसरी लाट रोखण्यासाठीही प्रभावी उपाय असल्याचा दावा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यात यशस्वी ठरलो तर तिसरी लाट निश्चितच रोखता येईल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला. Corona can be prevented by vaccination, experts believe; It also claims to be an effective measure to prevent the third waveकोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिहेरी फायदा आहे. लसीकरणामुळे कोरोनाचे मृत्यू 100 टक्के टाळू शकतो. लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण जरी झाली तरी प्रकृती चिंताजनक होण्याचे प्रमाण अत्यल्प असेल. तसेच इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण 60 ते 80 टक्क्यांनी कमी होईल, असे ऑर्गनाइज्ड मेडिसिन अॅपॅडेमिक गिल्डचे (ओमाग) सरचिटणीस व संसर्गजन्य आजार प्रतिबंधक क्षेत्रातील तज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा यांनी सांगितले.

एक डोस घेतल्यानंतरही कोरोना का होतोय?

लसीकरणाने भविष्यातील कोरोनाचा धोका टाळू शकतो, हे जरी खरे असले तरी लसीचे शास्त्र प्रत्येकाने जाणून घेण्याची गरज आहे, असे डॉ. गिलाडा यांनी सांगितले. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोनाला प्रतिकार करणारी शक्ती शरीरात निर्माण होते. एक डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामागे हे कारण असल्याचे डॉ. गिलाडा यांनी सांगितले.

Corona can be prevented by vaccination, experts believe; It also claims to be an effective measure to prevent the third wave

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*