नंदीग्राममधून निवडणूक लढविणे ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका


ममता बॅनर्जींना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चात्ताप होतो आहे. तृणमूल काँग्रेसमधले लोकं सांगतात की ममता बॅनर्जींनी रागात नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी ही सर्वात मोठी चूक केली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : ममता बॅनर्जींना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चात्ताप होतो आहे. तृणमूल काँग्रेसमधले लोकं सांगतात की ममता बॅनर्जींनी रागात नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी ही सर्वात मोठी चूक केली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.Mamata Banerjee’s biggest mistake is contesting from Nandigram, criticizes Prime Minister Narendra Modi

ममता बॅनर्जी या दरवेळी कोलकातामधील भोवानीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. मात्र त्यांच्याच मंत्रीमंडळातील सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये आल्या. मात्र, अधिकारी कुटुंबाचा नंदीग्राम बालेकिल्ला मानला जात असल्याने ममता पराभवाच्या छायेत आहे.



या पार्श्वभूमीवर ममतांवर टीका करताना मोदी म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवून खूप मोठी चूक केली आहे. त्यांच्या पराभवाच्या चिंतेचं सर्वात मोठ कारण त्यांचं गेल्या १० वर्षांतील रिपोर्ट कार्ड आहे.

ममतांना दोन वेळा संधी मिळाली परंतु, त्यांनी गेल्या १० वर्षात काय केलं? जुने व्यवसाय बंद पडले, नव्या व्यवसायांचे मार्ग बंद झाले. पश्चिम बंगालमध्ये उद्योग रोखण्यात आले. सिंगूरमध्ये तृणमूल काँग्रेसनं केवढा मोठा विश्वासघात केला. आज सिंगूरमध्ये ना उद्योग ना तिथला शेतकरी सुखी आहे. शेतकरी दलालांमुळे हैराण झाला आहे.

ममता बॅनर्जी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये जाण्याचं आव्हान दिलं आहे. त्यावर बोलताना मोदी म्हणाले, वाराणसीमध्ये ममता बॅनर्जींना मोठ्या मनाचे, टिळा लावलेले आणि शेंडी असलेले लोकं भेटतील.

त्याची त्यांना अडचण होईल. इथे त्यांना जय श्रीराम घोषणेचा राग येतो, तिथे त्यांना हर हर महादेव देखील ऐकायला मिळेल.ममता दीदी तुम्ही बंगालच्या नागरिकांवर विश्वास ठेवायला हवा. बंगालच्या लोकांनी त्यांचा कौल दिला आहे.

त्यांचा निर्णय झालाय की तुम्हाला तुमची टाका मार कंपनी (टीएमसी) घेऊन इथून निघून जावं लागेल, असा इशाराही मोदींनी दिला.ममतांवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, दीदी म्हणतात की, भाजपाच्या मेळाव्यात उपस्थित असलेली गर्दी पैशासाठी जमते.

बंगालमधील नागरिक विकू शकतात का? अहो, हे स्वाभिमानी लोक आहेत, संपूर्ण ब्रिटीश सत्ताही काही बिघडवू शकली नाही. दीदी, बंगालच्या लोकांचा अपमान करु नका. हे तेच लोक आहेत ज्यांनी दहा वर्षांपूर्वी तुम्हाला डोक्यावर घेतलं.

आज तुम्ही त्यांचा अपमान करत आहात. तृणमूल सरकारनं स्वत:च पश्चिम बंगालसाठी आपत्ती असल्याचं त्यांनी सिद्ध केलंय. जेव्हा एखादी समस्या समोर येते तेव्हा मदतीचा हात पुढे करायला हवा, असं मानवता सांगते. पण तृणमूलच्या लोकांनी संकटांनाच कमाईचं साधन बनवलं आहे.

Mamata Banerjee’s biggest mistake is contesting from Nandigram,criticizes  Prime Minister Narendra Modi

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात