भाजपच्या मंत्री स्मृती इराणींचा सवाल, गंभीर आरोपही केले आहेत Why is Kejriwal silent on the abuse of Swati Maliwal in CM House
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तन आणि मारहाणीप्रकरणी भाजप आक्रमक आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना ते या प्रकरणावर मौन का धारण करत आहेत, असा सवाल केला.
भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “स्वाती मालीवाल यांच्या मारहाणीच्या वेळी त्यांच्या व्यतिरिक्त कुटुंबातील कोणता सदस्य आणि कर्मचारी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी उपस्थित होते, ही माहिती केवळ मालीवाल आणि केजरीवालच देऊ शकतात.
स्मृती इराणी यांनी प्रियंका आणि राहुल गांधींना दिले ‘हे’ आव्हान, म्हणाल्या…
स्मृती इराणी यांनी अनेक प्रश्न विचारले, ‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत स्वाती मालीवाल यांना मारहाण झाली का? केजरीवाल अद्याप या प्रकरणी स्पष्टपणे का बोलले नाहीत? याचे उत्तर अद्याप लोकांना मिळालेले नाही.
दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी बुधवारी (२२ मे २०२२) वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी हवी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App