राहुल गांधींना “सिस्टीम” “आतून” माहिती आहे ना??, मग त्यांनी “या” प्रश्नांची उत्तरे द्यावीत; आसामच्या मुख्यमंत्र्यांचे आव्हान!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मी मूळातच सिस्टीम मध्येच जन्माला आलो. माझ्या आजी आणि वडिलांपासून मला पंतप्रधानांचे काम कसे चालते याची सगळी “सिस्टीम” “आतून” माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलीही सिस्टीम माझ्यापासून लपवून ठेवू शकत नाहीत. कारण मी “सिस्टीम” मध्येच जन्माला आलो. लहानपणापासून आजी आणि वडील यांना पंतप्रधान म्हणून काम करताना पाहिले, असा दावा राहुल गांधींनी हरियाणातला पंचकुला मधल्या भाषणात केला.Rahul Gandhi knows the “system” “inside out” doesn’t he??, so he should answer “these” questions; Assam Chief Minister’s challenge!!

राहुल गांधींच्या या वक्तव्यावरूनच आता आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी अनेक रहस्यमयी प्रश्न विचारून राहुल गांधींनी त्यावर आतल्या “सिस्टीम” मधून माहिती घेऊन खुलासा करावा, असे आव्हान दिले आहे. यात त्यांनी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातले रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा, बिहारचे माजी मुख्यमंत्री के. बी. सहाय्य यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचे मृत्यू कसे झाले?? अँडरसनला एंटरसनला पळून जाण्यात कोणी मदत केली??, वगैरे प्रश्नांचा भडीमार राहुल गांधींवर केला आहे. हेमंत विश्वशर्मा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर त्याचे तपशील लिहिले आहेत



 ते असे :

काल 22 मे 2024 रोजी मी राहुल गांधींना “सिस्टीम”ची रहस्ये कशी माहिती आहेत, याबद्दल बोलताना ऐकले. मला काही घटनांबद्दल त्यांच्या आठवणींना उजाळा देऊ द्या. जिथे आपण अजूनही “सिस्टीम”ची रहस्ये समजून घेण्यासाठी आणि उलगडण्याची वाट पाहत आहोत!!

1) माजी केंद्रीय रेल्वे मंत्री ललित नारायण मिश्रा यांचा इंदिरा गांधींशी मतभेद झाल्यानंतर गूढ बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. स्फोटामागे कोण होते??

2) बिहारचे माजी मुख्यमंत्री के. बी. सहाय, ज्यांनी जमीनदारी प्रथा रद्द केली, त्यांचा इंदिरा गांधींशी मतभेद होऊन ते बाहेर पडल्यानंतर एका गूढ कार अपघातात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची चौकशी का झाली नाही??

3) वॉरन अँडरसनला पळून जाण्याची परवानगी देण्यासाठी दिल्लीहून दूरध्वनी कोणी केला??

4) बोफोर्स आणि अशा इतर सौद्यांमधून लुटलेला पैसा कुठे लपवला गेला??

5) डॉ. मनमोहन सिंग यांनी शर्म-अल-शेखमध्ये पाकिस्तानला क्लीन चिट कोणाच्या सांगण्यावरून दिली??

– ही यादी मोठी आहे. मला वाटते की न्यायिक आयोगाची स्थापना करणे आणि राहुल यांना गोपनीय असलेल्या सर्व गुपितांची चौकशी करणे आणि त्यामुळे राष्ट्रीय हिताला हानी पोहोचण्यापासून वाचविणे हाच उत्तम मार्ग आहे.

राहुल गांधींनी सिस्टीम माहिती असल्याचे विधान केल्यानंतर हेमंत विश्वशर्मांनी असा प्रश्नांचा भडीमार केला आहे. त्यावर आता राहुल गांधी आणि बाकीचे काँग्रेस नेते कोणते आणि कसे उत्तर देतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Rahul Gandhi knows the “system” “inside out” doesn’t he??, so he should answer “these” questions; Assam Chief Minister’s challenge!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात