रईसींच्या निधनानंतर इराणमध्ये सत्तासंघर्षाचा धोका; धर्मगुरू अन् लष्करात वर्चस्ववाद उफाळण्याची शक्यता

वृत्तसंस्था

तेहरान : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. यानंतर इराण, भारत आणि अमेरिकेसह जगभरातील लोकांत हा प्रश्न उपस्थित होत आहे की, रईसी यांच्यानंतर देशाची सत्ता कोण सांभाळणार? इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागते. १९७९ मधील इस्लामिक क्रांतीनंतर सत्तेचे नेतृत्व कोण स्वीकारणार याचा निर्णय बऱ्याच अंशी सर्वोच्च नेतेच घेतात.Risk of power struggle in Iran after Raisi’s death; Supremacy is likely to rise in the clergy and the army



सध्या सुप्रीम लीडर अली खामेनी आहेत. ते ज्यांना पाठिंबा देतील त्यांच्या हाती सत्ता येणे निश्चित होते. देशात राजकीय स्थैर्य आणण्यासाठी नेते-धर्मगुरू आणि लष्करात समन्वय असणे गरजेचे आहे. यामुळे रईसींच्या अचानक मृत्यूमुळे सत्तासंघर्षाचा धोका घोंगावत असल्याचे मानले जाते. रईसींच्या जाण्याने इराणच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आतापर्यंत ते सर्वोच्च नेते खामेनी यांचे उत्तराधिकारी मानले जात होते. त्यांच्यानंतर खामेनी यांचे पुत्र मोजतबा आणि लष्करी नेत्यांचा रोल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. रईसी यंाचे उत्तराधिकारी शोधण्याशिवाय आता खामेनी यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित होत आहे. खामेनी ८५ वर्षांचे झाले आहेत.

 

इराणचे उपराष्ट्राध्यक्ष मुखबेर यांच्याकडे नेतृत्व

उपराष्ट्राध्यक्ष मोहंमद मुखबेर(६८) यांना काळजीवाहू राष्ट्राध्यक्षाची जबाबदारी दिली आहे. खामेनी यांनी सोमवारी याची घोषणा केली. मुखबेर २०२१ मध्ये इब्राहिम रईसी यांच्या निवडीनंतर उपराष्ट्राध्यक्ष झाले होते. ते रईसी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, रईसी रशियाचे सच्चे मित्र होते, यूएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या शोक संवेदना

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन म्हणाले, रईसी रशियाचे सच्चे मित्र होते. त्यांच्या कार्यकाळात देशांतील नाते आणखी बळकट झाले.

पंतप्रधान मोहंमद शिया अल सुदानी म्हणाले, रईसी यांच्या मृत्यूबाबत इराणचे सर्वोच्च नेते खामेनीप्रति आमच्या संवेदना आणि सहानुभूती आहे.

पंतप्रधान शरीफ यांनी १ दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. पाकमध्ये रईसी यंाच्या सन्मानार्थ देशाचा झेंडा अर्ध्यावर उतरवला जाईल.यूएई: राष्ट्राध्यक्ष नाह्यान म्हणाले, यूएई या कठीण काळात इराणच्या लोकांसोबत आहे. त्यांनी शोकग्रस्त कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या.

रईसी यांच्या निधनाचा परिणाम पश्चिम आशियातील देशांसोबत भारत आणि उर्वरित देशांवरही होईल. तेल आणि गॅसचा मोठा गुंतवणूकदार असल्यामुळे त्याच्या बाजारात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. सोमवारी निधनाला दुजाेरा मिळाल्यानंतर तेलाच्या किमती वाढल्या. दुसरीकडे, इराणच्या शेअर बाजारात घसरण आल्यामुळे तो बंद करावा लागला. भारत इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस आयात करतो. भारताने या महिन्यात चाबहार बंदराशी संबंधित एक करारही केला आहे. इराणमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास याचा परिणाम याच्या विकासात अडथळा ठरू शकते.

Risk of power struggle in Iran after Raisi’s death; Supremacy is likely to rise in the clergy and the army

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात