मुंबईतील 37 मशिदींमधून व्होट जिहादचे फतवे; शिवसेनेची निवडणूक आयोग + पोलिसांमध्ये तक्रार!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा सुरू असताना मुंबईतील एक दोन नव्हे, तर तब्बल 37 मशिदींमधून व्होट जिहादचे फतवे काढल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निवडणूक आयोगाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. नाशिक मध्ये काझींनी आजचे 7 निकाह रद्द करून मुस्लिम मतांचा टक्का वाढविण्याचे आवाहन केले. त्या पाठोपाठ मुंबईतील 37 मशिदींमधून व्होट जिहाद करण्याचे फतवे निघाल्याची बातमी आल्याने खळबळ माजली आहे. 37 masques issue fatwas for vote jihad, shinde shivsena goes to election commission and police

शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी या फतव्यांविरोधात आचारसंहिता भंगाची निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत समाजात द्वेष पसरवण्याचे हे कार्य असल्याचे म्हटले आहे. शिंदे गटाचे प्रवक्त किरण पावसकर यांनी या प्रकरणात फतव्याची प्रत देऊन मुंबईतील जे. जे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

पोलिसांनी गांभीर्याने घ्यावे

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी फतवे काढण्याचा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे. हा प्रकार म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. या फतव्याची प्रत पोलिसांकडे देऊन कारवाई झाली नाही. हे प्रकरण पोलिसांकडून गांभीर्याने हाताळले जात नाही. या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्याने दिरंगाई केली असेल त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केसरकर यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे आम्ही मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.

बाळासाहेबांची आठवण

दीपक केसरकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बंदी घातल्यासंदर्भातील आठवण सांगितली. विले पार्लेमध्ये बाळासाहेबांनी एकदा धार्मिक शब्द उच्चारला होता. तेव्हा त्यांना 6 वर्ष बंदी घातली होती. पण आता कारवाई होत नाही. ही लोकशाहीची हत्या आहे, असे फतवे निघत असतील तर निवडणुकीला काय अर्थ आहे?? लोकशाही मध्ये धर्माच्या नावाने प्रचार सुद्धा करता येत नाही. आता या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केसरकर यांनी केली.

4 तारखेला अनेकांच्या विकेट पडणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील मशिदीतून प्रथमच फतवे निघाले आहे. हे काम कोणत्याही धार्मिक लोकांनी करु नये. परंतु काही लोक जाती जातींमध्ये विष कालवण्याचे काम करत आहेत. आम्ही विकासाच्या मुद्यावर जात आहोत. यामुळे आता 4 तारखेला खूप विकेट पडलेला दिसणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

37 masques issue fatwas for vote jihad, shinde shivsena goes to election commission and police

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात