कन्या प्रेमापोटीच पवारांनी राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री केले नाही; अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा आरोप!!


विशेष प्रतिनिधी

सांगली : महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि अखेरचा टप्पा संथ गतीने सुरू असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा उसळलेला वाद तसाच सुरू राहिला आहे. राष्ट्रवादीत शरद पवारांनी कोणालाही मुख्यमंत्री का होऊ दिले नाही??, याची चर्चा पवारांच्या मुलाखतीपासून रंगली आहे. ती अद्याप कायम असून अजित पवारांची राष्ट्रवादी सातत्याने शरद पवारांवर त्याच मुद्द्यावर शरसंधान साधत आहे. Allegation of Ajitdada NCP spokesperson

उद्धव ठाकरे यांच्या पुत्र मोहापायी आणि शरद पवारांच्या कन्या मोहापायी त्यांचे पक्ष फुटले, असे शरसंधान आधीच भाजपने साधले होतेच, त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले.

सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याची शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात “डील” झाले होते. अडीच वर्षानंतर सुप्रिया सुळेंकडे सूत्रे दिली जाणार होती. पण सुप्रिया सुळे यांचं नाव आधीच उघड केलं असतं, तर त्यांना पक्षांतर्गत समर्थन मिळालं नसतं. त्याचवेळी पक्ष फुटला असता म्हणून पवार आणि ठाकरेंनी ही “डील” गुप्त ठेवली, असा आरोप अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला. सांगलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सन २००४ साली एक वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार राहिलेले अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी सक्षम, अनुभवी नव्हते, डॉ. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील,छगन भुजबळ, मधुकरराव पिचड, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनिल तटकरे या सारखे ३ ते ४ वेळा आमदार राहिलेले, मंत्रीपदाचा अनुभव असलेले मातब्बर नेते जर मुख्यमंत्री पदासाठी सक्षम नव्हते, तर २०१९ ला एकदाही आमदार, खासदार नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेचाही अनुभव नसलेले, प्रशासनातील काहीच अनुभव नसणारे उद्धव ठाकरे पवारसाहेबांच्या दृष्टीने मुख्यमंत्री पदासाठी “सक्षम” आणि “अनुभवी” कसे झाले??, असा बोचरा सवाल उमेश पाटील यांनी केला.

२०१९ साली भाजप सोबतच्या डीलमध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळणार नव्हते, परंतु महाविकास आघाडी स्थापन करताना पहिले अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि पुढील अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री हा गुप्त फॅार्मुला ठरला होता. शिवसेनेचे तत्कालीन गटनेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. त्यांना बहुतेक सर्व आमदारांचे समर्थनदेखील होते. परंतु संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी पवारांसमोर पुढील अडीच वर्षासाठी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याच्या मोबदल्यात पवारांनी महाविकास आघाडीचे निमंत्रक म्हणून पहिल्या अडीच वर्षासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडावा असा प्रस्ताव समोर ठेवला. नंतरच्या अडीच वर्षासाठी स्वत: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवतील असे ठरले होते, असा उलगडा उमेश पाटील यांनी केला.


शरद पवार गट अन् ठाकरे गट कॉंग्रेसमध्ये कधी विलीन होणार? जळगावात फडणवीसांनी सांगितली तारीख


२००४ साली शक्य असताना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री न बनवण्यामागे त्या पदासाठी राष्ट्रवादीमध्ये अनुभवी, सक्षम नेते उपलब्ध नव्हते हे फक्त सांगायचे कारण असून केवळ सुप्रिया सुळेंना भविष्यात राष्ट्रवादीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करण्याचा दूरदृष्टीकोन ठेवून आणि कन्या प्रेमापोटीच अजितदादांसह अनेक जेष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री पदापासून लांब ठेवले गेले. पक्षाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले, असा आरोपही उमेश पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करण्यात योगदान देणार्‍या छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, पद्मसिंह पाटील,अजित पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, मधुकर पिचड,यांच्यासह तत्कालिन नेत्यांपैकी कुणालाही मुख्यमंत्री न करून पक्षाच्या भविष्यावर अन्याय केला असल्याचेही उमेश पाटील म्हणाले.

रविवारी जेष्ठ नेते शरद पवार यांनी २००४ मध्ये अजितदादा पवार मुख्यमंत्री पदासाठी अनुभवी व सक्षम नव्हते त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री केले नाही, तर छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते तर त्याचवेळी पक्ष फुटला असता असा गौप्यस्फोट केला होता. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी रविवारी सांगली येथे पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

शरद पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याबद्दल आदर आहेच. मात्र शरद पवार यांनी अजितदादा व भुजबळसाहेबांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलणे गरजेचे असून आजच्या तरूण पिढीला व सर्वच कार्यकर्त्यांना तत्कालीन परिस्थिती, घडामोडी, त्यानंतरच्या घडामोडी याबाबत माहिती असणे आवश्यक आहे,म्हणून वस्तुस्थिती मांडल्याचे उमेश पाटील म्हणाले.

२००४ ला अजितदादा पवार सक्षम नव्हते हा केवळ शरद पवार यांचा बहाणा आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व देण्याचे स्वप्न तेव्हापासूनच होते.त्यामध्ये अडथळा नको, पक्षातील अजितदादा किंवा अन्य नेत्याला मुख्यमंत्री करून पक्षात समांतर नेतृत्व तयार होऊ नये म्हणूनच मुख्यमंत्री पद घ्यायचे टाळले गेले, असा थेट आरोपही उमेश पाटील यांनी केला.

राज्यात २०१९ मध्ये भाजपसोबत जायचे नक्की झाले होते. सर्वांची सहमती होती, शरद पवारसाहेबांच्या परवानगीने व सूचनेप्रमाणे सर्व प्रक्रिया सुरू होती.मात्र तरीही ऐनवेळी निर्णय बदलला. कारण अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे. त्यानंतरची अडीच वर्षे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे असे डील ठरले होते म्हणूनच भाजपसोबत जाण्याचा निर्णय ऐनवेळी बदललला. त्यावेळी सर्वच आमदारांनी सरकारमध्ये अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असतील तर सेनेसोबत करण्यात येणार्‍या डीलमध्ये सरकारमध्ये येऊ असे स्पष्ट केले आणि पहाटेचा शपथविधी मोडून अजितदादा पवार सर्व आमदारांच्या प्रेमापोटी परत आले. त्यामुळे त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपद देणे भाग पडले, असेही उमेश पाटील यांनी सांगितले.

Allegation of Ajitdada NCP spokesperson

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात