सगळी मिथके तोडून भाजप दक्षिणेतला सगळ्यात मोठा पक्ष ठरेल; पंतप्रधान मोदींना विश्वास!!

BJP will be the largest party in the south

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजप फक्त उत्तर भारतातला पक्ष आहे, भाजप फक्त शहरी पक्ष आहे, भाजपची दक्षिण भारतात ताकद नाही, ही विरोधकांनी उभे केलेली सगळी मिथके तोडून भाजप दक्षिण भारतात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला येईल, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले BJP will be the largest party in the south

पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी 2024 च्या निवडणुकांवर सविस्तर भाष्य केले



पंतप्रधान मोदी म्हणाले :

आमची रणनीती संपूर्ण देशात एकच आहे. दक्षिण भारतात भाजपची ताकद नाही, असा गैरसमज विरोधकांनी निर्माण केला, पण भाजप दक्षिण भारतात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. 4 जून रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील, तेव्हा एनडीए लोकसभेच्या 400 हून अधिक जागा जिंकेल.

वर्षानुवर्षे अनेकांनी काही बाबी गृहीत धरल्या. पहिल्यांदा भाजप हा शहरी पक्ष असल्याचे नॅरेटिव्ह चालवले गेले. पण भाजप ग्रामीण भागात अजून चांगला फुलला आणि फळाला आहे. सध्या भाजप हा उत्तर भारतातील पक्ष असा नेरेटिव्ह चालवला जातोय. पण गुजरात उत्तर भारतात नाही. गुजरातमध्ये गेल्या 25 ते 30 वर्षांपासून आमची सत्ता आहे. महाराष्ट्रातही आम्ही अनेकदा सत्तेवर राहिलो. कर्नाटकातही आमच्याकडे सत्ता होती. आंध्र प्रदेशमध्येही आम्ही पार्टनर होतो.

भाजपबद्दल विरोधकांनी भ्रम पसरवले. आलाय. भाजप पुरुषसत्ताक विचारांचा असल्याचे बोलले जाते. पण आमच्या पक्षात सर्वांत जास्त महिला खासदार आहेत. त्यानंतर आमचा पक्ष ब्राह्मण आणि बनियांचा पक्ष असल्याचे बोलले गेले. पण भाजपकडे सर्वांत जास्त दलित खासदार आहेत. आता दक्षिण भारतात भाजप नाही, असे नेरेटिव्ह पसरवण्यात येत आहे. पण दक्षिण भारतात भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे.

भाजप अल्पसंख्यांकांच्या विरोधातला पक्ष असल्याचे विरोधकांनी आरोप केले पण मी एकदाही अल्पसंख्याकांच्या विरोधात बोललेलो नाही. मी फक्त तुष्टीकरणाच्या राजकारणाला एक्सपोज केले.

भाजप सगळी मिथके तोडून 400 पार तर जाईलच, पण भाजप दक्षिण भारतातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला दिसेल. 2024 च्या निवडणुकांचे हे फलित असेल.

BJP will be the largest party in the south

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात