मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मोठं विधान


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : बंगालमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी संदेशखळी येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेवर ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बंगालमध्ये तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे शाहजहान शेख सारखे लोक जन्माला येत आहेत. संदेशखळी माझ्या आसाममध्ये असते तर मी 10 मिनिटांत शहाजहानचा हिशोब केला असता.Had the Sandeshkhali incident happened in Assam, Shah Jahan would have been accounted for within 10 minutes, Himanta Sarmas statement



संदेशखळी येथे भाजप उमेदवार रेखा पात्रा यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत ते म्हणाले की, ज्या देशात पूर्वी छत्रपती शिवाजी, खुदीराम बोस, स्वामी विवेकानंद यांसारखी माणसे निर्माण झाली. आज ममता दीदींसारख्या नेत्यांमुळे शहाजहानसारखी माणसे जन्माला येत आहेत. ते म्हणाले की मी 10 मिनिटांत शाहजहानचा हिशोब असा केला असता, की दुसरा शाहजहा जन्माला यायची हिंमत करणार नाही.

व्होट बँकेच्या तुष्टीकरणामुळे ममता सरकार शहाजहानला वाचवत असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, तृणमूलचे लोक अत्याचार सहन केलेल्या संदेशखळीच्या पीडित भगिनींना दोष देत आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करतात हे खेदजनक आहे. याशिवाय त्या काहीच करत नाहीत. 4 जून रोजी निकाल लागणार असून संदेशखळीतील जनतेला न्याय मिळणार आहे.

Had the Sandeshkhali incident happened in Assam, Shah Jahan would have been accounted for within 10 minutes, Himanta Sarmas statement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात