जाणून घ्या, हिमंता सरमा असं का म्हणाले?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्बा सरमा यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्यावरून राजद सुप्रीमो लालू यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लालूंना मुस्लिमांना आरक्षण द्यायचे असेल तर त्यांना पाकिस्तानात जावे लागेल, असे हिमंता म्हणाले.Lalu Yadav should go to Pakistan target of Himanta Biswa Sarma
ते म्हणाले की, लालू यादव यांनी नुकतेच सांगितले होते की, ते जिंकले तर संपूर्ण देशातील मुस्लिमांना आरक्षण देऊ. मुस्लिमांना आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी पाकिस्तानात जाऊन धर्माच्या आधारे आरक्षण द्यावे. कारण भारतात हे शक्य नाही.
यासोबत हिमंता सरमा यांनी आसाममधील मदरसे बंद करण्याच्या त्यांच्या सरकारच्या निर्णयाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, आसाम सरकारने राज्यातील 700 मदरसे बंद केले आहेत. यासोबतच त्यांनी काश्मीरबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी नरेंद्र मोदींचे सरकार आल्यास पीओके भारतात परत आणू, असे त्यांचे म्हणणे आहे. अयोध्येप्रमाणेच आता मथुरेतही मंदिर बांधले जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
याआधी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही लालू प्रसाद यादव यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या वकिलीवर जोरदार हल्ला चढवला होता, त्यांनी लालू यादव यांना कोणत्याही किंमतीत आरक्षण दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. लालू यादव यांनी कितीही प्रयत्न केले तरी मुस्लिमांना विशेष आरक्षण दिले जाणार नाही, असे ते म्हणाले होते. अत्यंत मागास समाज, दलित समाज, मागास समाज आणि गरीब सवर्ण समाजातील लोकांचे आरक्षण भाजप कोणत्याही किंमतीत संपू देणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more