वृत्तसंस्था
नवी दिल्ली : यंदा मान्सून सामान्य तारखेच्या एक दिवस आधी केरळमध्ये दाखल होऊ शकतो. हवामान खात्यानुसार मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये पोहोचेल. मात्र, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख 1 जून आहे. बुधवारी रात्री उशिरा हवामान खात्याने हा अंदाज जाहीर केला. जाहीर केलेल्या तारखेत 4 दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 28 मे ते 3 जूनदरम्यान कधीही मान्सून दाखल होऊ शकतो. याबरोबरच महाराष्ट्रात 9 ते 16 जून दरम्यान मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. IMD predicts monsoon to reach Kerala on May 31, arrival in Maharashtra between June 9 and 16
विभागाच्या म्हणण्यानुसार, मान्सून अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बेटांवर दोन दिवस अगोदर म्हणजेच 19 मे रोजी पोहोचण्याची शक्यता आहे, तर तेथे पोहोचण्याची सामान्य तारीख 21 मे आहे. गेल्या वर्षीही अंदमान आणि निकोबार बेटांवर 19 मे रोजी मान्सून दाखल झाला होता, मात्र केरळमध्ये 9 दिवस उशिराने 8 जूनला पोहोचला होता.
पुढील चार दिवस 25 राज्यांमध्ये पाऊस नाही; अल-निनोचा प्रभाव, मान्सूनचा हंगाम कोरडा
गेल्या वर्षी 8 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला
आयएमडीच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाच्या तारखा गेल्या 150 वर्षांत खूपच वेगळ्या होत्या. 1918 मध्ये मान्सून 11 मे रोजी प्रथम केरळमध्ये पोहोचला, तर 1972 मध्ये, तो 18 जून रोजी सर्वात उशिरा केरळमध्ये पोहोचला. गेल्या चार वर्षांचे बोलायचे झाले तर 2020 मध्ये मान्सून 1 जून, 2021 मध्ये 3 जून, 2022 मध्ये 29 मे आणि 2023 मध्ये 8 जून रोजी केरळमध्ये पोहोचला.
ला निनामुळे चांगला पाऊस अपेक्षित
एल निनो आणि ला निना असे दोन हवामान प्रकार आहेत. गेल्या वर्षी एल निनो सक्रिय होता, तर यावेळी एल निनोची परिस्थिती या आठवड्यात संपली असून तीन ते पाच आठवड्यांत ला निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, एल निनोदरम्यान, सामान्यपेक्षा 94% कमी पाऊस झाला होता. 2020 ते 2022 पर्यंत ला निना ट्रिपल डिपदरम्यान, 109%, 99% आणि 106% पाऊस पडला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more