वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मी कधीही अल्पसंख्याकांच्या विरोधात एक शब्दही उच्चारलेला नाही. भाजप केवळ आजच नव्हे तर कधीही अल्पसंख्याकांच्या विरोधात राहिलेला नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी कुणालाही ‘विशेष नागरिक’ म्हणून स्वीकारण्यास तयार नाही. ‘पीटीआय व्हिडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी काँग्रेसवर टीका केली. राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष तानाबाना आहे. त्याकडे काँग्रेस कानाडोळा करत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांतून मी विरोधी पक्षांच्या व्होट बँकेच्या राजकारणाचा आणि अल्पसंख्याक लांगुलचालनाचा पर्दाफाश करत आहे. परंतु मोदींना त्यांच्या वक्तव्यावरून अल्पसंख्याकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी अल्पसंख्याकाच्या विरोधात एक शब्दही बोललो नाही. मी केवळ काँग्रेसच्या व्होट बँकेच्या राजकारणाविरुद्ध बोलत आहे. काँग्रेस राज्यघटनेच्या विरुद्ध काम करत आहे. हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.2PM Modi said, BJP is not against minorities; But a special citizen will not obey anyone
मोदींच्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे….
विजयाबद्दल म्हणाले, आतापर्यंतचा कौल लक्षात घेतल्यास रालोआ पुढे आहे. काँग्रेस व इंडी आघाडीचे अनेक राज्यांत खातेही उघडलेले नाही. आम्ही 400 चा आकडा पार करू.
दक्षिण-पूर्वेबद्दल म्हणाले, भाजप 2019 मध्ये दक्षिण भारतातील सर्वात मोठा पक्ष होता. यंदाही असेच होईल. नक्षलग्रस्त रेड कॉरिडॉर असलेली पूर्वेकडील राज्ये आता भगव्या रंगाची होतील.
ते पुढे म्हणाले रोजगाराची संधी निर्माण करण्यात आमचे ट्रॅक रेकॉर्ड गेल्या सरकारच्या तुलनेत चांगले आहे. जगभरातील चांगल्या संधी भारताच्या उंबरठ्यावर आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
आरक्षणवर म्हणाले, एसटी, एससी, ओबीसी आरक्षण संपणार असल्याचा काँग्रेसचा निरर्थक व हास्यास्पद असा आरोप आहे.
राज्यघटनेवर म्हणाले, बाबासाहेबांच्या राज्यघटनेविना माझ्यासारखी सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीची व्यक्ती कधीही या पदापर्यंत येऊ शकली नसती. माझे कल्याण राज्यघटनेत समाविष्ट आहे.
पाकिस्तानबद्दल ते म्हणाले पाकिस्तानचे नेते काँग्रेसच्या राजपुत्रांचे कौतुक करत आहेत. या पाठिंब्यामुळे आपल्याला फायदा होत असल्याचे काँग्रेसलाही वाटते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App