वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : एलन मस्क यांची ‘स्पेसएक्स’ कंपनी आज नवा इतिहास रचणार आहे. कंपनीतर्फे अंतराळवीर नाही तर सामान्य नागरिकांना अंतराळात पाठविण्यात येणार आहे. Today, a new history will be made in the field of space missions, spaceX will fly in space with four
सहभागी सदस्यांची नावे अशी जेअर्ड इसॅकमॅन, हेली अर्केनो, शॉन प्रॉक्टर, ख्रिस सेम्ब्रोस्क. या मोहिमेद्वारे अंतराळ पर्यटनास यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. यातून चार जणांना अंतराळाची सैर करण्याची संधी मिळणार आहे. फ्लोरिडाच्या केनडी स्पेस रिसर्च सेंटर येथून स्पेसएक्सचे यान चौघांना घेऊन अवकाशात भरारी मारेल. उड्डाणाची वेळ कंपनीने निश्चिरत केलेली नाही. हवामानाचा अंदाज घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
या मोहिमेला ‘इन्स्पिरेशन -४’ असे नाव देण्यात आले आहे. अब्जाधीश जेअर्ड इसॅकमॅन (वय ३८) हे या मोहिमेचा सर्व खर्च करणार आहेत. यासाठी इसॅकमॅन यांनी स्वतःचा पैसा पुरविला आहे. तसेच देणगीही गोळा केली आहे. अमेरिकेतील टेनसीमधील सेंट चिल्ड्रेन रिसर्च हॉस्पिटलसाठी निधी गोळा करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट मोहिमेतून २० कोटी डॉलर एवढा निधी जमविण्याचे इसॅकमॅन याचे स्वप्न आहे. यातील निम्मी रक्कम ते रुग्णालयाला देणार आहेत. कर्करोगाबद्दल जागृती करणे हाही एक हेतू यामागे आहे. या मोहिमेतील सदस्य यापूर्वी कधीही अंतराळात गेलेले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App