विज्ञानाची गुपिते : सूर्याच्या आधीपासूनच अंतराळात पाणी, सौरमंडळामध्ये अनेक ग्रहांवर त्याचे अस्तित्व


पाणी हे मूलद्रव्य आपल्या सौरमंडळामध्ये सर्वत्र आढळते. ते केवळ पृथ्वीवर द्रव स्वरूपात असले तरी अन्य अंतराळामध्ये विविध ग्रहांच्या उपग्रहावर उदा. चंद्रावर बर्फाच्या स्वरूपात दिसून आले आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर, त्यांच्या चंद्रावर मेटेरॉईट्‌ससारख्या खनिजांच्या नमुन्यामध्ये पाणी आढळले आहे. The secret of science: water in space before the sun, its existence on many planets in the solar system

पृथ्वीवर असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत नेमका कोणता होता, हे ओळखण्यासाठी मिशीगन विद्यापीठामध्ये संशोधन करण्यात येत आहे. आपल्या सौरमंडळातील सूर्याच्या निर्मितीच्याही आधीपासून अंतराळामध्ये बर्फाच्या माध्यमात पाणी असावे, असे या संशोधनातून दिसून आले आहे. सौर मंडळ निर्मितीच्या सुरवातीचा अभ्यास करण्यासाठी बर्फ असलेले कॉमेट आणि ऍस्टेरॉईड हे मुख्य घटक आहेत.

त्यावरील सूर्याच्या निर्मितीनंतर त्यांचे गोलाकार स्वरूपात रूपांतर झाले असावे. मात्र, या बर्फाचा नेमका स्रोत अद्यापही कळू शकलेला नाही. जर पाणी हे सौर मंडळाच्या आधीपासून अंतराळामध्ये उपलब्ध होते, तर त्यातही सेंद्रिय जैव घटक असणार आहेत. तेच पुढील टप्प्यामध्ये पसरले गेले असण्याची शक्यशता आहे. मात्र, सूर्याच्या निर्मितीवेळी होत असलेल्या विविध घटनांमध्ये पाण्याचा उगम असेल, तर मात्र प्रत्येक ताऱ्याच्या निर्मितीवेळची स्थिती वेगळी असणार आहे. अभ्यासातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते, ती म्हणजे पाणी हे सूर्यजन्माच्या आधीपासूनच अंतराळामध्ये असावे.

सौरमंडळामध्ये असलेल्या हायड्रोजन आणि त्याचा जड आयसोटोप ड्युटेरीयम यांच्या अभ्यासावर संशोधकांनी आता लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पाण्याच्या मूलद्रव्यातील हायड्रोजन आणि ड्युटेरीयम या आयसोटोपच्या गुणोत्तरातून पाणी मूलद्रव्य कसे तयार झाले, याविषयी माहिती होऊ शकते. ग्रहावर जीवन फुलण्यासाठी पाणी सर्वांत महत्त्वाचे मानले जाते. त्यातून देखील महत्वाची माहिती मिळू शकते. कारण कोणत्याही ग्रहावर जीवन निर्माण होण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे संशोधकांनी त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्या ग्रहावर मुबलक पाणी आहे तेथे नक्कीच जीवसृष्टी असण्याची शक्यता अधिक आहे.

The secret of science: water in space before the sun, its existence on many planets in the solar system

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात