भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथील सोला अना मशीदीला भेट देऊन विजयासाठी आशिर्वाद घेत आपल्य प्रचाराला सुरूवात केली. प्रियंका तिबरटलवाल यांनी उभ्या केलेल्या आव्हानामुळे ममता बॅनर्जी यांना घाम फुटला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.Mamata Banerjee launches campaign in Bhawanipur with blessings of Sola Ana Masjid, BJP accused of breaking a sweat

भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा घरचा मतदारसंघ मानला जातो. २०११ पासून त्या येथून निवडून येत आहेत. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव झाल्याने ममता येथून पोटनिवडणूक लढवित आहेत. मात्र, भाजपाच्या प्रियंका तिबरटवाल यांनी त्यांना आव्हान दिले आहे.



ममता बॅनर्जी यांच्या मशीदीच्या भेटीवर टीका करताना सुवेंदू अधिकारी मानले, भाजपच्य उमेदवार प्रियंका तिबरटवाल यांना प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना घाम फुटला आहे. त्यामुळेच त्यांना एका मशीदीतून आपल्या प्रचाराला सुरूवात करावी लागत आहे.

यावरून त्या कोणाच्या सोबत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. कोणाच्या जीवावर ममता बॅनर्जी पश्चिबम बंगालवर राज्य करत आहेत आणि भावानपूर मतदारसंघात विजयाची स्वप्ने पाहत अ ाहेत हे देखील स्पष्ट झाले आहे.भाजपाच्या बंगाल यूथ विंगच्या उपाध्यक्षा प्रियंका तिबरटवाल यांनी ममतांविरुध्द आव्हान उभे केले आहे.

भवानीपूर येथेच जन्म झालेल्या आणि वाढलेल्या प्रियंका या स्वत:ला भवानीपूरची मुलगी म्हणून घेतात. त्या म्हणतात ममता बॅनर्जी ज्याप्रमाणे म्हणतात की ‘बंगाली निजेर मायकेई चाये’ म्हणजे बंगालला स्वत:ची मुलगी हवी तसेच भवानीपूर निजेर मायकेई चाय म्हणजे भवानीपूरलाही स्वत:ची मुलगी हवी आहे.

तिबरटवाल या वकीलअसून बंगालमध्ये मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात भाजपाची बाजू मांडत आहेत.ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली असली तरी ५ नोव्हेंबरपर्यंत त्यांना निवडून येणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

Mamata Banerjee launches campaign in Bhawanipur with blessings of Sola Ana Masjid, BJP accused of breaking a sweat

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात