पुणे- पिंपरी चिंचवडमधील ‘मोफत’ शिवभोजन थाळी बंद; ग्राहकांना आता मोजावे लागणार १० रूपये


वृत्तसंस्था

पुणे : कोरोना काळात निर्बंध लावले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले होते. राज्य सरकारने गरजूंसाठी मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला होता. मागील अनेक महिन्यांपासून अनेक गरजू याचा लाभ घेत होते. ‘Free’ Shivbhojan Thali started by Mahavikas Aghadi government closed; Now you have to pay 10 rupees

मात्र. मंगळवारपासून ही मोफत शिवभोजन थाळी बंद केली आहे. यापुढे आता थाळीसाठी १० रूपये मोजावे लागणार आहे. याबाबतची माहिती शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत मिळून ११ ठिकाणी ही थाळी दिली होती. वाढता प्रतिसाद लक्षात घेता दोन्ही ठिकाणी सध्या ३७ केंद्रे आहेत. या माध्यमातून दररोज ६ हजार ३८ जणांना भोजन देण्यात येत आहे. आता नागरिकांना दहा रुपये केंद्र चालकाला द्यावे लागणार आहे.

केंद्रचालकांना सरकारकडून प्रत्येक थाळीमागे ४० रुपये अनुदान मिळत आहेत तर दहा रुपये ग्राहकाकडून मिळतात. हे अनुदान पुरवठा विभागाकडून चालकाच्या थेट बँक खात्यात दर १५ दिवसांनी जमा करण्यात येतात. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती.

‘Free’ Shivbhojan Thali started by Mahavikas Aghadi government closed; Now you have to pay 10 rupees

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण