रजनीकांतच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरला चाहत्यांकडून चक्क बकरीच्या रक्ताचा अभिषेक


वृत्तसंस्था

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत आणि चाहते यांचे नाते अतूट आहे. रजनीकांतचा चित्रपट म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणी असते. परंतु त्याच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांनी बकरीच्या रक्ताचा अभिषेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा निषेध केला जात आहे. Fans anoint Rajinikanth’s upcoming film poster with goat’s blood

रजनीकांतचा ‘अण्णाथे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रसिद्ध झाले. या पोस्टरवर काही चाहत्यांनी बकरीच्या रक्ताचा अभिषेक केला. त्यानंतर खुद्द रजनीकांतच्या काही समर्थकांनी या घटनेचे वर्णन ‘अप्रिय कृत्य’ असल्याचे म्हंटले आहे.

अखिल भारतीय रजनीकांत रसीकर मँड्राम (फॅन्स क्लब) चे प्रशासक आणि रजनीकांतचे जवळचे मानले जाणारे व्ही. एम. सुधाकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. हा प्रकार ‘खेदजनक’ असल्याचे म्हटले. सोशल मीडियाच्या एका व्हिडिओमध्ये रजनीकांतचे चाहत्यांनी एका बकरीची हत्या केली. तसेच तिचे रक्त चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरवर शिंपडल्याचे दिसून आले. या घटनेचा व्यापक निषेध होत आहे.

तामिळनाडूमध्ये, रजनीकांत सारख्या टॉप स्टार्सच्या कटआउटवर दूध ओतले जाते. त्याला ‘पालाबिषेकम’ अर्थात देवावर दुग्धाभिषेक म्हणून ओळखला जातो. परंतु रक्त शिंपडण्याची घटना ऐकली किंवा पहिली नव्हती. व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत सुधाकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘ हा प्रकार खेदजनकच असून तीव्र निंदनीय देखील आहे.’ ‘आम्ही विनंती करतो की अशा अप्रिय कृत्यांमध्ये कोणीही सामील होऊ नये.’ दिग्दर्शक शिवा यांनी दिग्दर्शित ‘अण्णाथे’ हा चित्रपट ४ नोव्हेंबरला दिवाळीत प्रदर्शित होत आहे.

Fans anoint Rajinikanth’s upcoming film poster with goat’s blood

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण