वीज बिल थकबाकी वसुलीसाठी डाव, सरकारला सावकारी वसुली करायचीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

नागपूर : थकबाकीची वसुली करण्यासाठी सरकारकडून बाऊ केला जात आहे. वीजबिल वसुली करण्यासाठी सरकारचा हा डाव आहे. सावकारासारखी वसुली सरकारला करायची आहे. त्यामुळेच राज्य अंधारात बुडेल अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.Devendra Fadnavis alleges that the government wants to recover the light bill like the lender.

वीजबिल थकबाकीची वेळेवर वसुली झाली नाही तर संपूर्ण राज्य अंधारात जाऊ शकतं, अशी चिंता उजार्मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती. यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, त्यांनी जे सादरीकरण केले त्यामध्येच लक्षात येते की त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली.ही थकबाकी आपण दाखवतोय, यामध्ये विशेषत: कृषी पंपांच्या संदर्भात क्रॉस सबसीडी आहे. त्यानंतर जे काही आपलं नुकसान आहे, ते नुकसान भरुन काढण्याकरिता आपल्याला जो जकात मिळतो, त्यातुन नुकसान भरुन काढतो. त्यामुळे या ठिकाणी जबरदस्तीने वसुली करण्याकरिता हा बाऊ केला जात आहे.

एकीकडे कोरोनामुळे शेतकरी, सामान्य माणूस अडचणीत आहे. तो अडचणीत असताना त्याला मदत करण्याऐवजी जबरदस्तीने वसुली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसुली या सरकारला करायची आहे. त्यामुळे हे सगळं नाटक सुरु आहे,अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis alleges that the government wants to recover the light bill like the lender.

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण