ज्ञानवापीत शिवलिंग : पापी औरंग्याने गाडलेला देदीप्यमान इतिहास बाहेर येतोय आणि मराठी माध्यमे वर्तमानाचा चिखल चिवडताहेत!!


तिकडे काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरात 400 वर्षांपूर्वी पापी औरंग्याने गाडलेला दैदिप्यमान इतिहास संपूर्णपणे कोर्टाच्या कायदेशीर कारवाईतून बाहेर येतोय… संरक्षित आणि सील बंद होतोय… आणि इकडे महाराष्ट्र मुलखात मराठी माध्यमे वर्तमानाचा राजकीय चिखल चिवडत बसली आहेत!!

इतिहास खऱ्या अर्थाने करवट घेतो आहे. तब्बल 400 वर्षांनंतर ऐतिहासिक सत्य बाहेर येते आहे. त्याविषयी उत्सुकतेने, अभिमानाने पाहायचे तर सोडाच, पण त्याविषयी मराठी माध्यम संशयाने किरकोळ काही तरी लिहीत आहेत, दाखवत आहेत आणि त्या पलिकडे जाऊन वर्तमानातल्या राजकारणाचा चिखलच जास्त चिवडत बसली आहेत. The glorious history of the sinful Aurangzeb buried 400 years ago in the Kashi Vishwanath Dham corridor area is a complete court action.

100 % कायद्याच्या कसोटीतून सर्वेक्षण

काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीचे 3 दिवस सर्वेक्षण झाले. त्याच्यात त्रोटक बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. सर्वेक्षण पूर्ण झाले तेव्हा ज्ञानवापी मशीद परिसरात शिवलिंग आढळल्याच्या बातम्या हिंदी आणि इंग्रजी माध्यमांनी ठळक दिल्या. मात्र त्यात संशय व्यक्त केला. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाची कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार 100 % कायद्याच्या कसोटीवर उतरून केल्यानंतरही हिंदी आणि इंग्लिश माध्यमांचा संशय फिटला नाही. पण निदान त्यांनी बातम्या देऊन या विषयाला चांगले कव्हरेज तरी दिले!!

– मराठी माध्यमांचा दर्जा

पण त्याच वेळी इकडे मराठी माध्यमांनी काय केले, तर एकूणच ज्ञानवापी मशिद वादाकडे दुर्लक्ष केले. पण मग या काळात मराठी माध्यमांचे विषय तरी काय आहेत?? तर शरद पवार – केतकी चितळे वाद. केतकीच्या विकृत पोस्टवरून तिची बाजू घेणारे आणि तिच्या विरोधात भांडणारे नेते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस – मनसेप्रमुख राज ठाकरे यांची वक्तव्ये, त्यांच्यातले वाद, एकमेकांवरचे शरसंधान हे मराठी माध्यमांच्या हेडलाईनचे विषय राहिले आहेत. मूळात असले वाद हेडलाईनचे विषय होतात, यातूनच सध्याचा मुख्य प्रवाहातील मराठी माध्यमांची लायकी आणि दर्जा सिद्ध होतो!! (याचा अर्थ संबंधित नेत्यांमधील वादाच्या बातम्या देऊ नयेत असा नाही. पण बातम्यांची निवड आणि ते देण्याचे प्रमाण किती ठेवावे?? याबाबत काही तारतम्य बाळगावे की नाही??, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.)

– चिल्लर वादातून हेडलाईनचा शोध

मग भले केतकी चितळे किंवा तिच्या विरोधातले लोक काही लिहू देत. काहीही करू देत. ते कायद्याच्या कसोटीवर उतरले नाही तर त्यांना शिक्षा ठरलेली आहे. ती व्हायची ती होईलच. पण या सगळ्यात मराठी माध्यमे मात्र स्वतःच्या टीआरपीसाठी देशात घडत असलेल्या मुख्य ऐतिहासिक घटनेकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रातल्या चिल्लर वादात हेडलाईन शोधताहेत… हा खरा दुर्दैवाचा भाग आहे!!क्षेत्रे मुक्त करण्यात मराठ्यांचा मोलाचा वाटा

काशी विश्वनाथ, मथुरा, अयोध्या ही तीर्थक्षेत्रे मुस्लिम आक्रमकांपासून मुक्त करण्याची महत्त्वाकांक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळगली होती. त्या महत्त्वाकांक्षेच्या प्रेरणेतून आणि बळावर नंतर मराठ्यांनी ती क्षेत्रे काही काळ मुक्त करून दाखवली होती. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास याची साक्ष आहे. मराठी वीरांचे काशी विश्वनाथ क्षेत्र मुक्त करण्यात एवढे मोठे योगदान असताना आज जेव्हा पापी औरंग्याने गाडलेला इतिहास बाहेर येतो आहे तेव्हा मराठी माध्यमे कसला करंटेपणा दाखवत आहेत?? बाहेर आलेल्या इतिहासाकडे संशयाने पाहून पूर्ण दुर्लक्ष करत आहेत!!

– चिखलफेकीतून नॅरेटिव्ह सेटिंग

देशात प्रचंड मोठा इतिहास घडतो आहे. इतिहास नवे वळण घेतो आहे. येणाऱ्या भविष्याची चाहूल दाखवतो आहे… पण देदीप्यमान भविष्याची ही स्पंदने मराठी माध्यमे टिपताहेत आहेत का??, तर याचे उत्तर ठळक “नाही” असेच आहे. इतिहास भविष्यवेधी करवट घेत असताना मराठी माध्यमे मात्र एकमेकांवर चिखलफेक करणार्‍या नेत्यांच्या नादी लागून आपल्याच राजकीय नॅरेटिव्ह सेटिंगच्या कर्दमात लोळत पडली आहेत!!

The glorious history of the sinful Aurangzeb buried 400 years ago in the Kashi Vishwanath Dham corridor area is a complete court action.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात