ज्ञानवापीत शिवलिंग : कायद्याच्या कसोटीवर 100% उतरलेले सर्वेक्षण; कोर्टात सादर होणाऱ्या अहवालात सत्यान्वेषण!!

वृत्तसंस्था

काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात तिसऱ्या दिवशी आतमध्ये शिवलिंग सापडले. यानंतर कोर्टाने जेथे शिवलिंग सापडले ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित सर्वेक्षण कोर्टाच्या आदेशानुसार आणि कायद्याच्या 100% कसोटीवर राहून केल्याची ग्वाही काशीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. Surveys that pass 100% of the test of law; Verification in the report submitted to the court

शिवलिंग सापडल्याच्या परिसरातील सर्व जागा सील करण्याचे आदेश कोर्टाने हिंदू पक्षाच्या फिर्यादीच्या वकिलाच्या अर्जावर दिले आहेत. वाराणसीतील ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण सोमवारी तिसऱ्या दिवशी पूर्ण झाले. सर्वेक्षणानंतर हिंदू पक्षाचे वकील डॉ. सोहनलाल यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले, आतमध्ये “बाबा” सापडले आहेत. “जिन खोजा तीन पाया”. यावरून समजून घ्या, काय शोधले जात होते आणि काय मिळाले!! बरेच काही अवशेष सापडले आहेत, असे ते म्हणाले.

 •  ज्ञानवापी मशिदीच्या आत 75 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 15 फूट उंच असलेल्या पश्चिमेकडील भिंतीजवळचा ढिगारा याचे सर्वेक्षण ही पुढची पायरी आहे.
 •  मुस्लिम पक्षाची सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी
 • मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अंजुमन इनाजानिया मस्जिद कमिटीने वाराणसी न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या निर्णयाला आव्हान देत जी याचिका दाखल केली आहे तिची सुनावणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर उद्या होणार आहे.
 • दुसरीकडे, मुस्लिम बाजूच्या वकिलाने हिंदू पक्षाचे दावे फेटाळून लावले आहेत. पण या वकिलाने सर्वेक्षणावर समाधान देखील व्यक्त केले आहे.
 •  उद्या, 17 मे रोजी वाराणसी कोर्टात अहवाल सादर होणे अपेक्षित आहे. वादी-प्रतिवादी पक्षातील 52 जणांचे पथक कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 8.30 वाजता आवारात दाखल झाले होते. 10.30 च्ये सुमारास सर्वेक्षण संपले.
 • उद्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग रवीकुमार दिवाकर यांच्या कोर्टात अहवाल सादर केला जाणार आहे. मात्र, अहवाल तयार करण्यास वेळ लागू शकतो, असे वकिलांचे म्हणणे आहे. आयुक्त अजय कुमार मिश्रा म्हणाले की, आयोगाचा कृती अहवाल १५ दिवसांत तयार करायचा आहे. उद्या कोर्टात अहवाल सादर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.


 •  हिंदू पक्षाचे वकील डॉ. सोहनलाल म्हणाले की, नंदी ज्याची वाट पाहत होते ते शिवलिंग मिळाले. इतिहासकारांनी जे लिहून ठेवले होते, ते बरोबर आहे. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग दिसताच हर हर महादेवच्या घोषणा झाल्या. सर्वेक्षणात जी काही व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी केली, त्याची चीप ज्ञानवापी मशिदीच्या आवारातून बाहेर पडण्यापूर्वीच अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली, जेणे करून ती लीक होण्याची शक्यता नाही.
 •  ज्ञानवापी वाद प्रकरणी आज अलाहाबाद हायकोर्टातही सुनावणी सुरू आहे. एका वादाशी संबंधित 3-3 याचिका आहेत. 6 याचिकांवर सुनावणी होणार आहे.
 •  जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
 • ज्ञानवापी मशिदीत आढळलेल्या अवशेषांच्या मुद्द्यावरून हिंदू आणि मुस्लीम पक्षांनी वेगवेगळे दावे केले असले तरी या संदर्भात काशीचे जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सर्वेक्षणाबाबत कोणीही केलेला दावे हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. कोणाच्याही वैयक्तिक मतांना महत्त्व नाही, तर प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे त्याचा अहवाल कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा हे कोर्टात सादर करणार आहेत. कोर्टाच याबाबत निर्णय देईल.
 •  सर्वेक्षणात सामील असलेल्या एका व्यक्तीला आतल्या बातम्या लीक केल्याच्या आरोपावरून काढून टाकण्यात आले आहे.
 •  सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशीच्या घटना घडामोडी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः लक्ष ठेवले. त्यांनी उत्तर प्रदेशचे गृह सचिव अवनीश अवस्थी यांच्याकडून माहिती घेतली.
 •  एवढेच काय पण ज्ञानवापी मशिदीच्या घुमटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्याचा पोतही उच्च लेन्सच्या कॅमेऱ्याने छायाचित्रित करण्यात आला असून कालही त्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
 •  ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्व सर्वेक्षण कोर्टाच्या आदेशानुसार आणि कायद्याच्या संपूर्ण कसोटीवर उतरून केले असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिली आहे.
 •  ज्ञानवापी मशिदीच्या 500 मीटर परिसरात सार्वजनिक प्रवेशास बंदी घालण्यात आली होती. चारही बाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर पोलिस-पीएसीचा पहारा होता.
 •  सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी ज्ञानवापीची सुरक्षा वाढवण्यात आली होती. 16 लेयर सुरक्षा. पहिल्या दिवशी 10 लेयरची, तर दुसऱ्या दिवशी 12 लेयरची सुरक्षा होती.
 •  बंदोबस्तात प्रचंड वाढ

काशी विश्वनाथ मंदिरात ज्ञानवापीजवळील गेट क्रमांक 4 मधून प्रवेश दिला जात नाही. अशा स्थितीत गोदौऱ्याच्या दशाश्वमेध मार्गावर गेट क्रमांक 4 वरून भाविकांचा प्रवेश सुरू आहे. गेट क्रमांक एक ते गोदौलिया चौकापर्यंत सुमारे 400 मीटर लांबीची लाईन आहे.

 •  एक किलोमीटरच्या परिघात सुमारे 1500 पोलिस आणि पीएसी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 500 मीटरच्या परिघात सुरक्षेसाठी जवान सज्ज आहेत. छतावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सर्वेक्षण होईपर्यंत आजूबाजूची दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच आता सर्वे क्षित जागा सील करून तेथेही याच बंदोबस्ताची सज्जता ठेवण्यात आली आहे.

Surveys that pass 100% of the test of law; Verification in the report submitted to the court

महत्वाच्या बातम्या