पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळ लुंबिनी दौरा महत्त्वाचा का??; बुद्धम् शरणम् गच्छामि बरोबरच राजनैतिकही महत्व!!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला दुसरा दौरा आज नेपाळ मध्ये काढला आहे. यामध्ये गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुम्बिनीला भेट देऊन घेतल्या बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजच्या वास्तूचे भूमिपूजन तर करणार आहेतच,पण त्यापलिकडे जाऊन पंतप्रधानांचा लुंबिनी दौरा भारत नेपाळ संबंध आणि एकूण आंतरराष्ट्रीय संबंध त्याच्या राजनैतिक आणि व्युहात्मक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. Is Prime Minister Narendra Modi’s visit to Lumbini important?

  • भारताभोवतीचे देश चीनच्या कर्जाच्या विळख्यात आणि गर्तेत पूर्णपणे अडकले असताना नेपाळ सारखा देश त्यामध्ये अडकू नये याचे प्रयत्न भारत कसोशीने करतो आहे. या दृष्टीने देखील पंतप्रधानांचा चीन दौरा अतिशय महत्त्वाचा आहे.
  • चीनच्या कर्ज विळख्याचा अतिशय आर्थिक विषारी अनुभव श्रीलंका घेतेच आहे. त्यात नेपाळची भर पडू नये. कारण चीन नेपाळला अशीच कोट्यावधी डॉलरच्या कर्जाची लुभावनी ऑफर देत आहे. त्यापासून नेपाळला धोका आहे हेच भारत नेपाळ या दाखवून देऊ इच्छित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान शेरबहादुर देउबा यांच्या भेटीमध्ये हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा असणार आहे.

  • पंतप्रधान मोदी 2566व्या बुद्ध जयंती सोहळ्यालादेखील उपस्थित राहणार आहेत आणि बौद्ध विद्वान आणि भिक्षूंसह नेपाळ आणि भारतातील लोकांना संबोधित करतील. पंतप्रधानांच्या या भेटीचा उद्देश ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेसह नेपाळ आणि भारत यांच्यातील शतकानुशतके जुने धार्मिक संबंध वाढवणे हा आहे.
  • नेपाळमध्ये भारताच्या पुढाकाराने उभारल्या जाणाऱ्या इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. या ठिकाणी बौद्ध परंपरेचा अभ्यास होणार आहे.
  • भारत आणि नेपाळच्या पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ मेजवानीही ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये नेपाळी पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळासह उपस्थित राहणार आहेत.
  • 2014 नंतर पंतप्रधान मोदींचा हा पाचवा नेपाळ दौरा आहे. त्याचबरोबर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांचा हा पहिला नेपाळ दौरा आहे. आपल्या मागच्या भेटीत पंतप्रधान मोदींनी काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिर, जनकपूर धाम येथील जानकी माता मंदिर आणि मुस्तांग येथील मुक्तिनाथ मंदिराला भेट दिली होती.
  • नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी अलीकडेच त्यांच्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्ली आणि वाराणसीला भेट दिली. त्यांनी काशी विश्वनाथ आणि कालभैरव मंदिरात पूजा केली. यानंतर त्यांनी वाराणसीमध्ये विधवांसाठी निवारागृहाची पायाभरणीही केली होती.

Is Prime Minister Narendra Modi’s visit to Lumbini important?

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!