शेतकरी आंदोलनाचा “राजकीय” इफेक्ट : भारतीय किसान युनियनमधून अलग पडले राकेश टिकैत!!


केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी आंदोलन इतिहास जमा होऊन काही महिने उलटले आहेत. आंदोलनातले राकेश टिकैत नावाभोवतीचे वलय देखील आता धुसर झाले आहे. political effect of the farmers movement Rakesh Tikait broke away from the Indian Farmers Union

– छुपे राजकारण भोवले

पण काल अचानक एक बातमी आली. महेंद्रसिंह टिकैत यांनी स्थापन केलेल्या भारतीय किसान युनियन मध्ये उभी फूट पडली असून राकेश टिकैत आता आपल्या पित्याने बांधलेल्या त्याच संघटनेत अलग थलग पडले आहेत. राकेश टिकैत यांना शेतकरी आंदोलनात त्यांनी केलेले “छुपे राजकारण” भोवले आहे.

– भारतीय किसान युनियन (अराजनैतिक)

त्यांचेच एक सहकारी राजेश चौहान यांनी भारतीय किसान युनियन मधल्या असंतुष्टांना एकत्र करून भारतीय किसान युनियन (अराजनैतिक) अशी नवी संघटना स्थापन केली आहे. या संघटनेची स्थापना करताना त्यांनी उत्तर प्रदेश हरियाणा मधल्या बड्या शेतकरी नेत्यांना आपल्या समवेत पत्रकार परिषदेत बसवले होते. राकेश टिकैत आणि त्यांचे भाऊ नरेश टिकैत यांना पूर्णपणे वगळले होते.

– फूट रोखण्याचे प्रयत्न फेल!!

वास्तविक राकेश टिकैत यांना भारतीय किसान संघटनेत युनियनमध्ये फूट पडते हे माहिती होते. त्यांनी ही फूट रोखण्याचे प्रयत्न देखील केले होते. लखनऊमध्ये असंतुष्ट नेते हरिनाम सिंह यांच्या घरी ते उतरले होते. असंतुष्ट नेत्यांना चुचकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पण राकेश टिकैत यांना ते अजिबात जमले नाही. भारतीय किसान युनियन मध्ये फुट पडायची ती पडलीच आणि आपल्या पित्याच्या संघटनेत राकेश टिकैत अलग थलग पडले.



– मोदी – योगी – ममता

पण हे घडण्यामागचे कारण कोणतेही अचानक उद्भवलेले नाही. राकेश टिकैत यांना त्यांनी शेतकरी आंदोलनात केलेले राजकारण नडले आहे. त्यांनी उघड – उघड केंद्रातल्या मोदी आणि उत्तर प्रदेशातल्या योगी सरकार विरुद्ध लढा पुकारला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा उघड प्रचार केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध प्रचार केला. अनेक शेतकरी नेत्यांना राकेश टिकैत यांची राजकारणातली ही लुडबुड मान्य नव्हती.

– राजकीय भूमी गमावली

राकेश टिकैत स्वतःसाठी राजकीय भूमीची मशागत तर करू शकले नाहीतच, पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या विजयाचे काहीअंशी श्रेय देखील त्यांना मिळवता आले नाही. उत्तर प्रदेशात तर खुद्द त्यांचा इलाका मानण्यात येणाऱ्या मुजफ्फरपूरमध्ये भाजपने दणकून विजय मिळवला. पश्चिमी उत्तर प्रदेश पट्यात देखील भाजपला चांगले यश मिळाले. म्हणजे भारतीय किसान युनियनच्या रूपाने महेंद्र सिंग टिकैत यांनी केलेली राजकीय भूमीची मशागत राकेश टिकैत यांना टिकवून ठेवता आली नाही. त्यांनी ती गमावली.

– खलिस्तानी एलेमेंट्सना प्रतिबंध नाही

याखेरीज खालिस्तानी एलिमेंट्स शेतकरी आंदोलनात घुसल्यानंतर आंदोलन मागे न घेण्याचा खामियाझा देखील त्यांना आपल्याच संघटनेत फूट पडून भोगावा लागलेला दिसतो आहे.

– लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा

लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकणे हे शेतकऱ्यांना न आवडलेले आंदोलनाचे फलित होते. शेतकरी आंदोलन खलिस्तानचे समर्थक अजिबात नव्हते आणि नाहीत. पण राकेश टिकैत यांनी योग्यवेळी आंदोलन मागे घेतले नाही. खलिस्तानी एलिमेंट्सना ते परिणामकारक प्रतिबंध करू शकले नाहीत. हा त्यांच्यावर भारतीय किसान यूनियन मधल्याच शेतकरी नेत्यांनी घेतलेला आक्षेप आहे. या आक्षेपाला त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे.

– उसने चंद्रबळ

आता जेव्हा भारतीय किसान युनियन मध्ये फुट पडली आहे तेव्हा देखील काही नवे चंद्रबळ आणून 2 – 4 लोक भारतीय किसान युनियन मधून बाहेर पडले आहेत, असे ते बोलत आहेत. वास्तविक राजेश चौहान यांच्या नेतृत्वाखालील भारतीय किसान युनियन (अराजनैतिक) मध्ये उत्तर प्रदेश मधल्या सर्व जिल्ह्यामधल्या प्रतिनिधींचा समावेश होता. तो आणखी वाढत जाणार आहे. येत्या 15 दिवसात भारतीय किसान युनियन (अराजनैतिक) ही संघटनात्मक बांधणी पूर्ण करण्याचा त्यांचा मनसूबा आहे. त्याला टक्केवारीच्या भाषेत किती यश येईल हा जरी पुढचा भाग असला तरी सध्या राकेश टिकैत आपल्या पिताश्रींनी स्थापन केलेल्या भारतीय किसान युनियन मधून अलग थलग पडले आहेत ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही.

भारतीय किसान युनियन हे शेतकऱ्यांचे संघटन असेल. कोणत्याही राजकीय पक्षाची त्याला देणेघेणे नसेल. छुपे अथवा उघड राजकारण करण्यामध्ये या संघटनेला रस नसेल, असे जाहीर करताना राकेश टिकैत हे शेतकरी आंदोलनात “छुपे राजकारण” करत होते, हेच त्यांना यातून सुचवायचे आहे, असे दिसून येते.

केंद्र सरकारशी आणि उत्तरे सरकारशी अनावश्यक पंगा घेण्याचे कारण नाही, असे सूचक उद्गार नवीन संघटनेच्या काही नेत्यांनी काढले आहेत. या उद्गारांना राजकीय आणि अराजकीय अशा दोन्ही पार्श्‍वभूमीवर फार महत्त्व आहे.

political effect of the farmers movement Rakesh Tikait broke away from the Indian Farmers Union

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात