Congress Chintan Shivir : भाजपवर तोंडी तोफा; ममता – पवारांसह प्रादेशिक पक्षांवरच डाव उलटवण्याचा काँग्रेसचा मनसूबा!!


राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेसचे जे चिंतन शिबिर पार पडले त्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना खरंच दोन मोठे कार्यक्रम हाती लागले. काँग्रेस महात्मा गांधी यांच्या जयंती पासून काश्मीर ते कन्याकुमारी अशी “भारत जोडो” यात्रा काढणार आहे, तसेच स्वतः राहुल गांधी आता देशव्यापी दौरा करणार आहेत. या दोन्ही दोन्हींचा काँग्रेस संघटनेसाठी निश्चित उपयोग होईल यात शंका नाही. Oral gun on BJP; Mamata – Congress intends to turn the tide on regional parties including Pawar

– संघटन पुन्हा उभे राहणे महत्वाचे

काँग्रेस संघटनात्मक पातळीवर पूर्णपणे ठप्प झालेली असताना चिंतन शिबिरात जाहीर केलेले कार्यक्रम जर खरंच प्रत्यक्षात आणले तर काँग्रेस सारख्या मोठ्या संघटनेला वर्षा-दीड वर्षात पुन्हा भाजपसमोर उभी करणे अवघड नाही. यामध्ये भाजप विरोधात जिंकणे हा मुद्दा सध्या तितकासा महत्त्वाचा नाही, तर काँग्रेस संघटन पुन्हा उभे करणे हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. उदयपूर चिंतन शिबिरात जाहीर केलेले कार्यक्रम पक्षाच्या नेत्यांनी काटेकोरपणे अमलात आणले, तर काँग्रेसचे संघटन पुन्हा उभे राहील, एवढेच मर्यादित अर्थाने त्याकडे पाहिले पाहिजे. पण सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता हे देखील खूप मोठे फळ देणारे कार्यक्रम ठरतील.



– प्रादेशिक नेत्यांवर त्यांचाच डाव उलटणार

पण त्या पलिकडे जाऊन देखील काँग्रेसच्या चिंतन शिबिरात नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हाती काही विशिष्ट गोष्टी लागल्या आहेत. त्या म्हणजे काँग्रेस आता प्रादेशिक पक्षांचा डाव त्यांच्यावरच उलटवला सिद्ध झाली आहे… म्हणजे नेमके काय झाले आहे??, हे नीट बारकाईने समजून घेतले पाहिजे… यासाठी प्रादेशिक पक्षांचा नेमका डाव काय आहे??, हेही लक्षात घेतले पाहिजे.

– ममता, पवार, केसीआर यांच्या मर्यादा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तेलंगण राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशच्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांच्यात समान धागा काय आहे तर भाजपवर तोंडी तोफा डागून पण प्रत्यक्षात जमिनी स्तरावर काँग्रेस कार्यकर्त्यांना फोडून स्वतःचा पक्ष बळकट करणे हा या चारही नेत्यांचा “किमान समान राजकीय कार्यक्रम” राहिला आहे. या चौघाही नेत्यांचे राजकीय पक्ष मूळच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बळावरच तर खऱ्या अर्थाने उभे आहेत. यापैकी तेलंगण राष्ट्र समिती वगळता बाकी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या नावातून “काँग्रेस” हा शब्द देखील वगळण्याची हिंमत झालेली नाही यातच त्यांच्या प्रादेशिक पातळीवरच्या देखील मर्यादा स्पष्ट होत आहेत.

हे सर्व नेते भाजपवर जोरदार तोंडी तोफा जरूर डागतात. पण प्रत्यक्षात स्वतःचे पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस फोडतात. ही त्यांची वर्षानुवर्षांची राजकीय खोड आहे.

– “राजकीय बारशाचे” जेवण!!

प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा हा डाव काँग्रेस नेत्यांच्या लक्षात येत नव्हता, असे मानणे दुधखुळेपणाचे ठरेल. वास्तविक पाहता काँग्रेस हायकमांड या सर्व नेत्यांचे “राजकीय बारसे” जेवली आहे. पण 2014 नंतर काँग्रेसला जबरदस्त राजकीय फटका बसला त्यातून काँग्रेस हायकमांड स्वतःलाच सावरण्याच्या स्थितीत नव्हती. 2019 मध्ये हा फटका थोड्याफार फरकाने रिपीट झाला.

– “भारत जोडो” यशस्वी झाले तर…

पण आता काँग्रेस हायकमांड मात्र स्वतः सावरण्याच्या आणि पक्ष सावरण्याच्या स्थितीत आलेली आहे. किंबहुना काँग्रेसच्या हायकमांडला “नाऊ ऑर नेव्हर”ची देखील जाणीव झाली आहे. त्यामुळेच उदयपूर मधल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने परफेक्ट राजकीय कार्यक्रम आखला आहे. खरे म्हणजे काँग्रेसला प्रादेशिक पक्षांचा “करेक्ट कार्यक्रम” करायचा आहे आणि यासाठीच राहुल गांधींनी आपल्या भाषणात प्रादेशिक पक्षांच्या मर्यादांवर थेट हल्ला चढवला आहे. काँग्रेस भाजपसमोर वैचारिक पातळीवर लढा देणारा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे हे त्यांनी वारंवार अधोरेखित केले आहे. त्यांचे भाषण लोकसभेतल्या भाषणा सारखे आक्रस्ताळे नव्हते, हे त्याचे वैशिष्ट्य होते. त्यांनी अनावश्यक गांधी सावरकर असा वाद उकरून काढला नाही. पण काँग्रेसची वैचारिक निष्ठा मात्र पुन्हा पुन्हा अधोरेखित केली. त्यामुळे काँग्रेस आता खरंच “सिरीयस मोडवर” आहे, असे वाटू लागले आहे. त्यांना स्वतःच्या पक्षाचे संघटन पुन्हा उभे करायचे आहे आणि त्यासाठीच राहुल गांधी यांचा देशव्यापी दौरा तसेच गांधी जयंती पासून “भारत जोडो” यात्रा या दोन्ही कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. हे दोन्ही कार्यक्रम मर्यादित अर्थाने अथवा मोठ्या अर्थाने यशस्वी झाले, तर काँग्रेस संघटनेसाठी पुन्हा चांगले दिवस येणे फार दूर नाही.

– प्रादेशिक पक्षांची कंबख्ती!!

पण या निमित्ताने भाजपसमोर आव्हान उभे राहण्याबरोबरच प्रादेशिक पक्षांची राजकीय कंबख्ती ओढविल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित!! कारण भाजपसमोर मोठे आव्हान उभे करताना काँग्रेस देखील प्रादेशिक पक्षातल्या नेत्यांना फोडल्याशिवाय राहणार नाही जो हातखंडा प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसवर आजमावून तोच हातखंडा आता काँग्रेस प्रादेशिक पक्षांवर लावल्याशिवाय राहणार नाही त्यातूनच खऱ्या अर्थाने भाजपसमोर मोठे आव्हान उभे करण्याचा काँग्रेसच्या हायकमांडच्या मनसुबा दिसतो आहे.

Oral gun on BJP; Mamata – Congress intends to turn the tide on regional parties including Pawar

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात