काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन करताना काही लोक माझ्या मृत्यूची प्रार्थना करत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन होत असताना काही लोक खालच्या पातळीवर गेले होते. येथे माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली गेली. हे पाहून खूप आनंद झाला. काशीतील लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे हे शत्रूंनाही दिसले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.While inaugurating Kashi Vishwanath Dham, some people were praying for my death, Prime Minister Narendra Modi alleged

बूथ विजय संमेलनासाठी बनारस येथे बोलताना मोदी म्हणाले, काशीची जनता मला सोडणार नाही आणि मरेपर्यंत काशीही मला सोडणार नाही. काशीची सेवा करताना माझा मृत्यू झाला तर याहून मोठे सौभाग्य काय असेल. मी भक्तांची सेवा करता करता मेलो तर त्याहून उत्तम काय होईल.



काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी बनारसमध्ये आले होते. तेव्हा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हटले होते की, शेवटच्या क्षणी लोकांनी काशीमध्येच रहावे. त्यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले.पंतप्रधान म्हणाले, पूवीर्चे सरकार कट्टर कुटुंबीयांनी चालवले होते.

त्यांच्या पक्षाशी कुटुंबवाद आणि माफियावाद निगडीत आहे. सेवा आमच्या कुटुंबाशी निगडीत आहे. कोरोनाचा काळ हे त्याचे उदाहरण आहे. आमच्या लोकांनी घरोघरी औषधे आणि रेशन पोहोचवले. बनारसमध्ये किती विदेशी नागरिक अडकले. परंतु, काशीच्या जनतेने त्यांना त्रास होऊ दिला नाही.

महाशिवरात्रीला लाखो भाविक येणार आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांची सेवा करायची आहे. बनारसप्रमाणेच प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या विकासाला आमचे प्राधान्य आहे. येथील विकासामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. पण माफिया लोक प्रत्येक विकासाकडे जातीयवादी नजरेने पाहतात. वाराणसीतील लोकांकडून मला खूप प्रेम आणि आदर मिळाला आहे. माझ्या गैरहजेरीत तुम्ही सर्व भाजप कार्यकर्ते काम सांभाळता. तुम्ही माझ्यासाठी मुक्त विद्यापीठ आहात.

While inaugurating Kashi Vishwanath Dham, some people were praying for my death, Prime Minister Narendra Modi alleged

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात