Kili Paul :  किली पॉल-नीमा वर पंतप्रधान मोदी देखील फिदा ! त्यांच्या प्रतिभेचा आदर करत ‘मन की बात’मध्ये उल्लेख… म्हणाले भारतीय संगीताची जादू…


किली आणि नीमा यांनी भारतीय चित्रपटांच्या अनेक गाण्यांवर उत्कृष्ट लिप सिंक केले आहे. शेरशाह चित्रपटातील राता लंबिया या गाण्यानंतर त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती.


यानंतर केवळ टांझानियातच नव्हे तर जगभरात त्यांची ओळख होऊ लागली. आता पीएम मोदींनी देखील मन की बातमध्ये त्यांचा उल्लेख करून त्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली:टांझानियन भाऊ-बहीण जोडी किली पॉल आणि निमा सोशल मीडिया स्टार बनले आहेत. ते देखील भारतीय गाण्यांच्या लिप सिंकने त्यांना लोकप्रिय केले आहे.ही बाब केवळ जनतेपर्यंतच नाही तर पंतप्रधानांपर्यंत देखील पोहोचली . आणि पंतप्रधान देखील या बहीण भावाच्या जोडीवर फिदा झाले .त्यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये  किली पॉल आणि नीमा यांचा उल्लेख केला म्हणाले या दोघांनाही भारतीय संगीताची आवड आहे जूनून आहे …Kili Paul: Prime Minister Modi also falls in love with  Kili Paul-Neema! Respecting his talent mentioned in ‘Mann Ki Baat’ … said the magic of Indian music …

मन की बात’मध्ये किली आणि नीमाबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले- ‘भारतीय संस्कृती आणि परंपरेबद्दल बोलतांना, आज मला ‘मन की बात’मध्ये दोन लोकांशी ओळख करून द्यायची आहे. आजकाल, किली पॉल आणि त्यांची बहीण निमा हे दोन टांझानियन भाऊ-बहीण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खूप चर्चेत आहेत.


Kili Paul Honoured : टांझानियाचा इन्स्टा स्टार-बॉलिवूडचा जबरा फॅन-किली पॉल-भारताकडून सन्मान ! कोण आहे किली पॉल ? बहिणीसोबत थिरकतो …


मला खात्री आहे की तुम्ही देखील त्यांच्याबद्दल ऐकले असेल. त्याला भारतीय संगीताची आवड आहे आणि म्हणूनच ते खूप लोकप्रिय आहेत. ते यासाठी किती मेहनत घेतात हे त्यांच्या लीप सिंक करण्याच्या पद्धतीवरून दिसून येते

त्यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘जन गण मन’ राष्ट्र गीत गातानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक गाणे गाऊन लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती. किली आणि नीमा या दोन भावंडांचे या अद्भुत सर्जनशीलतेबद्दल मी मनापासून कौतुक करतो. काही दिवसांपूर्वी टांझानियातील भारतीय दूतावासातही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/reel/CZwjkQvsV8x/?utm_source=ig_web_button_share_sheet

पंतप्रधानांकडून एखाद्याच्या प्रतिभेला एवढा आदर मिळणे ही एक मोठी उपलब्धी आहे. किली आणि नीमा यांनी भारतीय चित्रपटांच्या अनेक गाण्यांवर उत्कृष्ट लिप सिंक केले आहे. दोघेही त्यांच्या पारंपारिक मसाई कपड्यांमध्ये गातात तसेच नाचतात. सोशल मीडियावर त्यांच्या मनोरंजनाची ही पद्धत सर्वांनाच आवडते.

Kili Paul: Prime Minister Modi also falls in love with  Kili Paul-Neema! Respecting his talent mentioned in ‘Mann Ki Baat’ … said the magic of Indian music …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात