Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यंत्रणेला केलं अलर्ट


युक्रेनवर जोरदार हल्ला करूनही पुतीन एव्हढ्यावर थांबले नाहीत. रविवारी त्यांनी आणखी एक निर्णय घेऊन संपूर्ण जगाला चकित केले. पुतिन यांनी रशियन अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ या युद्धाचे कधीही अणुयुद्धात रूपांतर होऊ शकते. 


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला (Nuclear Deterrence Force) अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. जगाच्या इतिहासात कुठल्याच देशाने अशाप्रकारे उघडपणे अणु हल्ल्याची धमकी दिल्याची ही पहिलीच घटना आहे. महत्वाची बाब म्हणजे यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी पुतिन यांनी आपल्या भाषणात जगातील सर्व देशांनाही धमकी दिली होती.त्यामुळे या युद्धाच रूपांतर आण्विक युद्धात  होण्याची शक्यता आहे.Russia Ukraine War: Will Russia drop atomic bomb on Ukraine? President Vladimir Putin alerted the system

युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की रशियन सैन्याने युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किवमध्ये प्रवेश केला असून तेथे रस्त्यावरील लढाई सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर या युद्धाला आणखी एक नाट्यमय वळण लागू शकते. नाटोला प्रत्युत्तर देताना रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी रविवारी रशियन अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

रशियन अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवण्याच्या पुतीन यांच्या आदेशानंतर न्यूक्लियर मॉनिटरिंग एजन्सीने (यूएन न्यूक्लियर वॉचडॉग) एक महत्त्वाची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी ही बैठक होणार असून यामध्ये 35 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

Russia Ukraine War: Will Russia drop atomic bomb on Ukraine? President Vladimir Putin alerted the system

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात