गाढ झोपून हा युवक मिळवितो लाखो रुपये, यू ट्यूबची कमाल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ढाराढूर झोपण्याची सवय असल्याने अनेकांचे आर्थिक नुकसान होते. परंतु, एक युवक असा आहे की त्याची गाढ झोपायची सवय त्याला लाखो रुपये कमवून देते. हा युवक आठवड्यातून एकदा आपल्या खोलीतील कॅमेरा सुरू करून झोपायला जातो.This young man earns millions of rupees by sleeping in the dark

हजारो लोक त्याच्या हालचालींचे रात्रभर निरीक्षण करतात. त्यातून यूट्युबचा मोठा व्यवसाय होत असून, हा युवकही एकाच रात्रीत दोन लाख रुपयांची कमाई करतो.सुपर मेनस्ट्रीम नावाचा यूट्यूब चॅनेल या युवकानेसुरू केला आहे. एका रात्री हा युवक खोलीतील कॅमेरा सुरू करून झोपायला जातोव त्याचा चॅनेल बघणारे लोक अ‍ॅलेक्सा स्पीकरच्या माध्यमातून त्याला विविध प्रकारचे संदेश, व्हिडिओ पाठवितात. ते त्याच्यासाठी गाणीही वाजवतात. त्याला झोप लागू नये यासाठी प्रयत्न करतात. ते या युवकाला सतत जागे ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा युवक काहीवेळा अस्वस्थ होतो. बिछान्यावर कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करतो. या सर्व गोष्टी त्याच्या चॅनेलचे प्रेक्षक सतत पाहत असतात. त्याचा पैसे मोजून आनंद घेत असतात. त्यातून यूट्यूबचा मोठा व्यवसाय होतो.

या युवकाला रात्री झोपू न देण्याचा आनंद प्रेक्षक घेतात. त्याच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळत आहेत. त्यातून यूट्यूबचा जो व्यवसाय होतो, त्या उत्पन्नातील काही भाग या युवकाला दिला जातो. या घटनेमुळे झोप ही शरीराची केवळ आवश्यक बाब राहिलेली नाही, तर खूप पैसे कमावण्याचे साधनही झाली आहे.

This young man earns millions of rupees by sleeping in the dark

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात