AURANGABAD: उगाच ठेवी जो दूषण | गुण सांगतां अवगुण…! गुरूचे महत्व सांगताना राज्यपालांनी दिले समर्थ रामदास आणि शिवरायांचे उदाहरण …अर्थाचा झाला अनर्थ …


  • राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ”देश गुलाम झाला होता, अन्याय-अत्याचार वाढत होते. त्याविरोधात लढण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी यांनी केला. त्यांना समर्थ रामदासांसारखे गुरू मिळाले, ते सद्गुरू होते. त्यामुळे समर्थ रामदासांशिवाय शिवराय नाही.

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद:गुरूचे महत्व सांगताना राज्यपालांनी समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले .सोबतच चाणक्य आणि चंद्रगुप्त मोर्य यांचाही उल्लेख केला . समर्थ रामदास नसते तर शिवराय नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते.’ असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे .त्यांच्या वक्तव्यांचा विपर्यास करून अर्थाचा अनर्थ काही राजकीय मंडळींनी केला आहे .AURANGABAD: Explaining the importance of Guru, the Governor gave the example of Samarth Ramdas and Shivaraya.

समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असा आक्षेप आतापर्यंत अनेक राजकीय संघटना आणि पक्षांनी घेतले आहेत. मात्र, याचबाबत राज्यपालांनी वक्तव्य केल्याने आता नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच सोमवारी (२८ फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचं ते सांगत होते.

 

 

नेमकं काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?

‘आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते? समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते… चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे.’ असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

मी शिवराय किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.

 

‘संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. नोट आणि व्होटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे.’ असंही राज्यपाल यावेळी म्हणाले.

 

शिवाजी महाराजांनी गुरुदक्षिणा म्हणून समर्थांना राज्याची चावी देऊ केली”

“आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो,” असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

“समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे”

“मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वरांपासून समर्थ आणि आजपर्यंत अनेक लोकांनी आपल्या परीने योगदान दिलं आहे. आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत. समर्थांच्या साहित्याबद्दल आज दिवसभरात भरपूर चर्चा झाली असेल. यानंतर आपल्याला नक्कीच असं वाटलं असेल की समर्थांचा जो भारत, समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे,” असंही यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केलं

AURANGABAD: Explaining the importance of Guru, the Governor gave the example of Samarth Ramdas and Shivaraya.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती