काशी विश्वनाथाच्या सेवेकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अनोखी भेट


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथधाम येथे काम करणाऱ्या सेवेकऱ्यांना ज्यूटपासून तयार करण्यात आलेल्या पादत्राणांच्या शंभर जोड्या भेट म्हणून पाठविल्या आहेत.PM Modi gaves gift for workers in temple

येथील सेवेकऱ्यांना चामडे आणि रबरापासून तयार करण्यात आलेली पादत्राणे वापरता येत नाहीत त्यामुळे त्यांना हिवाळ्यामध्येही सर्वत्र अनवाणीच वावरावे लागते, याचा त्यांना खूप त्रास होतो. या मंदिरातील पुजारी, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कामगार आणि अन्यजणांना नव्या पादत्रणांचा लाभ होणार आहे.



पंतप्रधान मोदींच्या या भेटीवर सेवेकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून हिवाळ्यातील समस्यांपासून आमची सुटका झाली असल्याचे त्यांनी सांगितले.काश्वी विश्वनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासावर पंतप्रधान मोदींचे बारीक लक्ष असून ते येथील कामांचा वेळोवेळी आढावा घेत असल्याचे दिसून आले आहे.

देवस्थानाच्या कारभाराप्रमाणेच मंदिरातील दैनंदिन विधी आणि किरकोळ समस्यांकडेही मोदींचे बारीक लक्ष असते. मागील महिन्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते विश्वनाथधामच्या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी मोदींनी येथील सेवेकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

PM Modi gaves gift for workers in temple

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात