पंतप्रधान नरेंद्र मोदींची ५ जानेवारीपासून पंजाब मोहीम; ४२७५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शिलान्यास!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन आणि त्यानंतर कृषी कायदे मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी हे येत्या 5 जानेवारीपासून आपली पंजाब मोहीम सुरू करत आहेत. गेल्या दीड वर्षानंतर प्रथमच मोदी पंजाब मध्ये जात आहेत.Prime Minister Narendra Modi’s Punjab campaign from January 5; Foundation stone of projects worth Rs 42,750 crore

5 जानेवारीला मोदींचा फिरोजपूरचा दौरा असून ते राज्यासाठी विविध प्रकल्पांचा शिलान्यास करणार आहेत या सर्व प्रकल्पांची गुंतवणूक 42750 कोटी रुपयांची आहे. यामध्ये दिल्ली – अमृतसर – कटरा एक्सप्रेस वे, फिरोजपूरमध्ये पीजीआई सॅटेलाइट सेंटर, कपूरथळा आणि होशियारपूर येथील मेडिकल कॉलेज या सर्व विकास प्रकल्पांचा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.



या विकास प्रकल्पांच्या शिलान्यासाचा मुहूर्त साधून भाजप, कॅप्टन अमरिंदरसिंग यांची पंजाब लोक काँग्रेस आणि संयुक्त अकाली दल यांचा एकत्रित जाहीर मेळावा देखील फिरोजपूर मध्ये होणार आहे. या मेळाव्याला कॅप्टन अमरिंदरसिंग आणि संयुक्त अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह धिंडसा हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदी हे दीड वर्षांनंतर पंजाबच्या भूमीवर येत आहेत. शेतकरी आंदोलनात प्रामुख्याने पंजाब शेतकरी होते. त्यावरून मोठे राजकीय वादळ झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मोदींनी कृषी कायदे मागे घेतले.

यानंतर मोदी यांचा पहिला पंजाब दौरा होतो आहे. त्यातही विकास प्रकल्पांच्या शिलान्यास हे त्याचे निमित्त ठेवण्यात आले आहे. मोदींच्या या दौऱ्याची सरकारी पातळीवरून जोरदार तयारी झाली असली तरी जनतेचा प्रतिसाद त्यांना कसा मिळतो हे पाहणे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे.

Prime Minister Narendra Modi’s Punjab campaign from January 5; Foundation stone of projects worth Rs 42,750 crore

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात