जम्मू-काश्मिरात क्रूरकर्मा पाकिस्तानी दहशतवादी सलीम पारेला कंठस्नान, नागरिकांच्या हत्येत होता सामील

Pakistani terrorist Salim Pare dead in Encounter in Jammu and Kashmir, involved in killing of civilians

Pakistani terrorist Salim Pare :सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला चकमकीत ठार केले आहे. नागरिकांच्या हत्या आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्यांसह अनेक घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, सलीम पारे असे दहशतवाद्याचे नाव आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. Pakistani terrorist Salim Pare dead in Encounter in Jammu and Kashmir, involved in killing of civilians


वृत्तसंस्था

श्रीनगर : सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला चकमकीत ठार केले आहे. नागरिकांच्या हत्या आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्यांसह अनेक घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, सलीम पारे असे दहशतवाद्याचे नाव आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, या मोस्ट वॉन्टेड आणि क्रूरकर्मा दहशतवाद्याचा शोध अनेक दिवसांपासून सुरू होता. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात अजूनही चकमक सुरू आहे.

अरनिया सेक्टरमध्ये घुसखोराचा अंत

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मू विभागातील अरनिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. एका घुसखोराला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानकडून घुसखोरीचा हा दुसरा कट आहे. तत्पूर्वी, काश्मीर विभागातील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याला लष्कराच्या जवानांनी ठार केले.

पाकिस्तानला मृतदेह नेण्यास सांगितले

शनिवारी कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये बीएटी (पाकिस्तानची बॉर्डर अॅक्शन टीम) हल्ल्याचा कट उधळून लावत दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले. ठार झालेला दहशतवादी पाकिस्तानचा रहिवासी होता. मोहम्मद शब्बीर असे त्याचे नाव आहे. पाकिस्तानी लष्कराशी हॉटलाइनवर संपर्क साधून मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह परत घेण्यास लष्कराला सांगण्यात आले आहे.

Pakistani terrorist Salim Pare dead in Encounter in Jammu and Kashmir, involved in killing of civilians

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात