खलिस्थानवाद्यांनी घेतली पंतप्रधानांचा ताफा अडविल्याची जबाबदारी, चौकशी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही धमकी


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडविल्याची जबाबदारी खलिस्थावाद्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर सुरक्षेत झालेल्या चुकीचा तपास करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना धमकीही दिली आहे.Khalistanis take responsibility for blocking PM’s convoy, threaten Supreme Court justices

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याचा आरोप झाला.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्ती न्यायाधीशांच्या नेतृत्वात स्वतंत्र चौकशी समिती नेमली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या काही वकिलांनी त्यांना युनायटेड किंग्डममधून धमकीचे कॉल आल्याचा आरोप केला आहे.



हे रेकॉर्डेड कॉल असून त्यामध्ये पंजाबमधील मोदींच्या वाहतूक कोंडीची जबाबदारी आमची असल्याचा दावा शिख फॉर जस्टीस या खलिस्तान समर्थक संघटनेने केला आहे.सर्वोच्च न्यायालयातील वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितलं, मला युनायटेड किंग्डममधून २ रेकॉर्डेड कॉल आले.

त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मोदींच्या सुरक्षेच्या याचिकेपासून दूर रहावं असं सांगण्यात येत होतं. तसेच पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला ब्लॉक करण्याची जबाबदारी देखील घेण्यात आली.
सर्वोच्च न्यायालय मोदींच्या सुरक्षेवर सुनावणी घेत आहे.

पंजाबच्या शिख शेतकऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करू नका आणि मोदी सरकारला मदत करू नका. शिख फॉर जस्टीस मोदींचा ताफा फिरोझपूरमध्ये अडवण्यास जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी १९८४ चे हत्याकांड आठवावं. तुम्ही एकाही हत्याऱ्याला पकडू शकत नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला मदत केली तर ते त्यांचं सर्वात वाईट काम असेन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना सकाळी विमानाने भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण खराब हवामानामुळे काही काळ वाट पाहूनही हेलिकॉप्टरने जाणं अशक्य झाल्यामुळे त्यांनी अखेर गाडीनेच हुसैनीवालाला जायचा निर्णय घेतला.

या दोन तासाच्या प्रवासात हुसैनीवालापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांचा ताफा अडकला. याचे कारण पुढे काही आंदोलक आंदोलन करत होते. २० मिनिटे थांबल्यानंतर अखेर पंतप्रधानांनी आपला दौरा रद्द करून दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला.

Khalistanis take responsibility for blocking PM’s convoy, threaten Supreme Court justices

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात