विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal महायुतीतील विधान परिषद जागावाटप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांदरम्यान अखेर ज्येष्ठ नेते Chhagan Bhujbal आणि प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare माध्यमांसमोर एकत्र आले. “हम साथ-साथ आहेत, आमच्यात कोणताही वाद नाही,” असे सांगत दोन्ही नेत्यांनी मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.Chhagan Bhujbal
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सुनील तटकरे यांनी पक्षातील काही निर्णय, टीका आणि नेतृत्वाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावेळी भुजबळ यांनी “जे झालं ते झालं, आता पुढे जाऊया” असे म्हणत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती होती.Chhagan Bhujbal
मात्र शुक्रवारी दोन्ही नेते एकत्र आल्यानंतर त्यांनी कोणताही संघर्ष नसल्याचे स्पष्ट केले. सुनील तटकरे यांनी सांगितले की, “महायुतीच्या जागावाटपाचे चित्र उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल.” तर भुजबळ यांनीही माध्यमांशी बोलताना पक्षात सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला.
दरम्यान, महायुतीमध्ये विधान परिषद आणि राज्यसभा जागांवरून मोठी राजकीय हालचाल सुरू आहे. उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांनी रिक्त केलेल्या राज्यसभा जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असल्याचेही बोलले जात आहे.
महायुतीतील जागावाटपावर जवळपास ९९ टक्के सहमती झाल्याचा दावा भाजप नेते Chandrashekhar Bawankule यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. फक्त एक-दोन जागांवर अंतिम चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये Ajit Pawar यांच्या निधनानंतर नेतृत्व, संघटनात्मक बदल आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवरून विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर भुजबळ-तटकरे एकत्र आल्याने पक्षातील तणाव कमी झाल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App