राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सत्तेच्या तुकड्यासाठी भांडणे; शिंदे सेनेचे मराठवाड्यात पक्षप्रवेश सोहळे!!

Eknath Shinde.1

विशेष प्रतिनिधी

नाशिक : एकीकडे राष्ट्रवादी सत्तेच्या तुकड्यासाठी भांडणे तर त्याचवेळी शिंदे सेनेचे मराठवाड्यात पक्षप्रवेश सोहळे!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.Fight among NCP leaders for a share of power; Shinde Sena’s party entry ceremony in Marathwada!!...

राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेत्यांनी आपापल्या वारसांसाठी विधान परिषद किंवा मंत्री पदासाठी वशिले लावले. त्यावरूनच राष्ट्रवादीत पार्थ पवार विरुद्ध इतर असे भांडण जुंपले.

पण त्याचवेळी शिंदे सेनेने मराठवाड्यात मोठे पक्ष प्रवेश सोहळे आयोजित करून महायुतीत संघटनात्मक पातळीवर बाजी मारली.



– अहमदपूर मध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिवसेना प‌क्षाच्या वतीने विराट मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा आज संपन्न झाला. यावेळी माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह तब्बल २५ हजार कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

आजचा पक्षप्रवेश सोहळा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सोहळा असल्याचे सांगत विरोधकांच्या डोळ्यात कचरा गेला असेल तर त्यांनी येथे येऊन शिवसेनेचा हा महासोहळा पाहावा असा टोला लगावला. लोकांनी आपल्या कामाची पर्वा न करता प्रेमापोटी येथे गर्दी केली आहे, त्यामुळे आजचा दिवस हा आनंदाची दिवाळी असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

विनायकरावांच्या नावातच विनायक असून त्यांनी आज नव्या राजकीय आणि सामाजिक पर्वाचा श्रीगणेशा केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली २५ हजार कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतात, हा इतिहास आहे असे नमूद करून त्यांचे कौतुक केले.

सर्वसामान्य, शेतकरी आणि महिलांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे अधोरेखित करताना लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, सिंचन प्रकल्प, एमआयडीसी आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या लोकोपयोगी योजनांचा उल्लेख केला. ३० जूनपर्यंत दोन लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

अल निनोमुळे यावर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असली तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे यावेळी स्पष्ट केले. आज जलसंधारण, टँकरमुक्त गाव आणि जलव्यवस्थापनासाठी श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेसोबत सामंजस्य करार केल्याचे याप्रसंगी सांगितले. जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करून दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवायचा असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

या सभेला राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार हेमंत पाटील, आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार सुधाकर भालेराव, युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला, शेतकरी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Fight among NCP leaders for a share of power; Shinde Sena’s party entry ceremony in Marathwada!!...

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात