विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याच्या राजकारणात उपुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उयनराजे यांचा छतीसचा आकडा असल्याचे मानले जाते. मात्र या दोघांची पुण्यात भेट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सातारा येथील विकासकामे मार्गी लावण्यासाठी ही भेट झाली असली तरी त्याचे राजकीय अर्थ शोधले जात आहेत.Excitement in political circles over Ajit Pawar-Udayan Raje meeting in Pune
सातारा शहराचा हद्दवाढीमुळे विस्तार झाला आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी सुमारे 49 कोटींची आवश्यकता आहे. हा निधी मंजूर करावा, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीउदयनराजे भोसले यांनी पुण्यात भेट घेतली. यावेळी विकासकामांवर चर्चा झाली असली तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे 29.19 चौ. कि.मी क्षेत्र झाले आहे. विकास कामांच्या अनुषंगाने हद्दवाढ भागाचा सर्वे करण्यात आला आहे. रस्ते, गटारे, पथदिवे या पायाभूत सुविधांसोबत खुल्या जागांचा विकास करणे आवश्यक आहे. या प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांची अंदाजपत्रके नगरपालिकेने तयार केली आहेत.
त्याची किंमत सुमारे 4,850 लाख इतकी आहे. वाढीव भाग हा मूळ भागाच्या तिप्पट आहे. त्यामुळे वाढीव भागातील सुमारे 60 हजार 373 लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवणे नगरपालिकेस शक्य नाही. त्यामुळे नव्याने हद्दीत आलेल्या भागामध्ये प्राथमिक सोयी सुविधा पुरवण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाकडून अनुदान प्राप्त होते. त्या अंतर्गत सातारा नगरपालिकेस निधी मंजूर करावा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी मुख्याधिकारी अभिजीत बापट हेही उपस्थित होते.नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. सातारा येथील आमदार शिवेद्रराजे भोसले हे अजित पवार यांचे विश्वासू मानले जात. पण जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलेल्या या पराभवामुळे समीकरणे बदलण्याची चर्चा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App