कोरोनाच्या महासंकटात सुरू फडणवीसांच्या हॉस्पिटल पाहण्या; पवार-देशमुखांच्या मात्र “मातोश्रीवाऱ्या”


  •  पवारांनी म्हटला “उद्धवशांती मंत्र”

विशेष प्रतिनिधी

मुंबई : चांगलं चाललंय महाराष्ट्रात…!! कोरोनाच्या महासंकटाशी झुंजताना महाराष्ट्राने मुख्यमंत्रीपदासाठी कौल दिलेला नेता करतोय हॉस्पिटलच्या पाहण्या आणि बहुमतावर दरोडा घालून जुगाडू सरकार बनविणारे नेते करताहेत मातोश्रीच्या वाऱ्या. महाराष्ट्रात ही परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून दिसते आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पायाला भिंगरी लावल्यासारखे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. गेल्या आठवड्यात अकोला, अमरावती झाले, आता मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी परिसरातील कोविड हॉस्पिटलचे त्यांचे दौरे चालू आहेत. तिथली परिस्थिती पाहून ते सरकारला ground report देत आहेत. दिवसाआड सरकारला पत्रे लिहीत आहेत.

त्याचवेळी महाराष्ट्र सरकार नावाची तीन चाकी गाडी हाकणारे मुख्यमंत्री मात्र मातोश्रीतून हालायला तयार नाहीत. उलट तीन तिघाडी सरकारचे “दत्तक पिता” शरद पवार आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांना अनिल देशमुखांना घेऊन मातोश्री गाठताहेत. त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे देखील मातोश्रीवर पोहोचताहेत.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे देखील तिथे आहेत. म्हणजे महाराष्ट्र सरकार चालविण्याची बहुमत चोरून घेणारे सगळे नेते मातोश्रीवर जमले… पण तिथे चर्चा वाढत्या कोरोनावर किंवा महाराष्ट्राच्या समस्यांवर झाली नाही, चर्चा झाली ती, पोलिसांच्या बदल्या. एकमेकांच्या पक्षांची फोडाफोडी, आपापल्या पक्षांचे damage control याची…!! कोरोनाचे ना कोणाला सोयर होते, ना सुतक.

एरवी मीडिया देखील महाराष्ट्रावरच्या संकटात शरद पवार कसे active असतात, या चर्चेचा रतीब घालतो. त्या मीडियाने देखील बातम्या चालवायला सुरवात केली, “राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांची मनधरणी” म्हणजे मीडियाच्या बातम्यांमध्येही कोरोना महासंकटात सरकार कसे चाललेय? कसे चालले पाहिजे? मुख्यमंत्री किती active असले पाहिजेत? पवारांनी आपल्या कथित अनुभवातून त्यांन् कसे मार्गदर्शन केले पाहिजे? या विषयी चकार शब्द काढायला तयार नाही.

शिवसेना – राष्ट्रवादीत एकमेकांवर कुरघोडी चालू आहे. अजित पवारांनी पारनेरमध्ये शिवसेना फोडली. कल्याणमध्ये शिवसेनेने त्याची परतफेड केली. भाजपशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीची सत्ता घालवली आणि पवारांना जाग आली त्यांनी मातोश्री गाठून “उद्धवशांती” केली. जाता जाता पोलिस बदल्यांचीही चर्चा करून घेतली. पण राजकीय गदारोळात एकानेही कोरोना महासंकटाचे नावही उच्चारले नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था