बुलंद भारत की बुलंद तस्वीर!!


1980- 90 च्या दशकात वर उल्लेख केलेल्या शीर्षकाची एक जाहिरात दूरदर्शन वर झळकत असायची, “बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज!!”. A lofty picture of lofty India

पण आज हैदराबाद मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामानुजाचार्य यांच्या प्रचंड पुतळ्याचे अनावरण झाले आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने भारताची तस्वीर बदलल्याचाच प्रत्यय येतो आहे…!! मोदी सरकारच्या गेल्या सात वर्षांच्या काळात खरंच भारताची तस्वीर खऱ्या अर्थाने बदललेली दिसत आहे.

देशात मोदी सरकार येण्यापूर्वी भारताची तस्वीर काय होती? भारताची प्रतीके म्हणून कोणती पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे जाहिरातींमध्ये झळकवली जायची??, परदेशांमध्ये दाखवली जायची??, याचा साधा आढावा घेतला तर ताजमहाल, कुतुबमिनार, फत्तेपूर सिक्री, जामा मस्जिद, केरळमधले एखादे चर्च आणि अधुन मधुन एखादे मंदिर!!, अशा स्वरूपाची भारताची प्रतीके नकाशावर आणि परदेशांमध्ये दाखवली जायची. परदेशी बड्या पाहुण्यांना देखील ताजमहाल फत्तेपूर सिक्री जामा मस्जिद यांचे दर्शन घडवले जायचे. जणू काही या पलीकडे भारतात कोणती पर्यटन स्थळे किंवा भारतीय संस्कृतीची प्रतिनिधित्व करणारी प्रतीकेच नाहीत, असे भासवले जायचे.

भारताची बहुरंगी, बहुढंगी आणि बहुधर्मी प्रतिमा उंचावण्यासाठी आणि तथाकथित गंगाजमनी तहजीबचा उदो-उदो करण्यासाठी वर उल्लेख केलेली ताजमहल, कुतुबमिनार फत्तेपूर सिक्री, जामा मस्जिद हीच प्रतीके भारताचे प्रतिनिधित्व करणारी आहेत, असे अट्टाहासाने सांगितले जायचे.

पण आता मोदी सरकार आल्यानंतर गेल्या सात वर्षांमध्ये गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी, केदारनाथमध्ये आद्य शंकराचार्यांची प्रतिमा, दिल्लीच्या इंडिया गेट मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा आणि आज हैदराबादेत रामानुजाचार्य यांचा पुतळा ही भव्य प्रतीके उभारलेली आणि उजळलेली दिसत आहेत…!! भारताच्या बहुरंगी, बहुढंगी, बहुधर्मी प्रतिमेची ही खरी प्रतीके आहेत. यामध्ये तथाकथित गंगाजमनी तहजीबचा उदो – उदो नाही, की भारताच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणे नाही. आहे तो, गंगेसारखा पवित्र अध्यात्माचा वारसा जपण्याची ओढ आणि भारत खऱ्या अर्थाने सांस्कृतिक दृष्ट्या किती उन्नत आहे याचे दर्शन घडविण्याची आस. त्यामुळेच आज खऱ्या अर्थाने “बुलंद भारताची बुलंद तस्वीर” उभरताना दिसत आहे…!

A lofty picture of lofty India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात