म्हणे, राहुल गांधींचा सरकारच्या डोक्याला शॉट…, मिनू मासानी, पिलू मोदी, मधू लिमये, मधू दंडवते विरोधकांना तरी झेपतील काय??


काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाची सामनाच्या अग्रलेखात वारेमाप स्तुती करण्यात आली आहे. राहुलजींनी मांडलेले मुद्दे कसे मोदी सरकारला घेरणारे आहेत, मोदी सरकार राहुल गांधी यांच्यापुढे कसे निरूत्तर झाले, वगैरे शब्दांचे फुलोरे सामनाच्या अग्रलेखात सजविण्यात आले आहेत. can opposition afford piloo mody, minu massani, madhu limye, madhu dandawate?

राहुल गांधींची सामनाच्या अग्रलेखात स्तुती करण्यावर अजिबात आक्षेप घेण्याचे कारण नाही. सध्या शिवसेनेच्या धोरणानुसार तो अनिवार्य भाग असू शकतो. पण राहुल गांधींची स्तुती करताना सामनाच्या अग्रलेखात जे ज्ञान पाजळण्यात आले आहे, ना… त्याविषयी लिहिले पाहिजे. म्हणे… पिलू मोदी, बॅ. नाथ पै, मिनू मासानी, मधु लिमये, मधु दंडवते यांच्या भाषणाच्या वेळी पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी संसदेत उपस्थित राहात असत. इंदिरा गांधी तर पिलू मोदींच्या भाषणानंतर चांगले भाषण केल्याची चिठ्ठी पिलू मोदींना पाठवत असत.

एक आठवण म्हणून हा उल्लेख ठीक आहे, पण वर उल्लेख केलेल्या सर्व दिग्गज खासदारांच्या नावाचा उल्लेख राहुल गांधींबरोबर करणे… काही भान आहे का…?? जे राहुल गांधी आपल्या एकाच भाषणात काँग्रेसने २४ कोटी लोकांची गरिबी हटविली आणि नंतर २७ कोटी लोकांची गरिबी हटविली असे म्हणतात, त्या राहुल गांधींची तुलना पिलू मोदी, मधू लिमये, मधू दंडवते यांच्यासारख्या कसलेल्या खासदारांबरोबर…?? कमाल आहे…!! ज्या राहुल गांधींच्या आत्ता बोललेल्याचा, नंतर बोलण्याशी संबंध नसतो, आज बोललेल्याचा, उद्या बोललेल्याशी संबंध नसतो, ते राहुल गांधी मिनू मासानी, बॅ. नाथ यांच्या बरोबरीचे वक्ते…!!??, ही तर आणखी कमाल आहे.

पण आज मिनू मासानी, महावीर त्यागी, पिलू मोदी असते तर…

राहुल गांधींचे नेतृत्व आहे का तेवढे प्रगल्भ…?? संसदेच्या अधिवेशनातला राजकीय बौद्धिक स्तर आता बघितला तर एका गोष्टीची खंत वाटल्यावाचून राहत नाही, ती म्हणजे केंद्रातल्या मोदी सरकारला घेरायला खरंच प्रभावी विरोधी पक्षच नाही. जो काही विरोधी पक्ष आहे तो एका चढ एक नुसत्या आक्रस्ताळ्या नेत्यांनी भरलेला आहे. या नेत्यांमध्ये आक्रस्ताळेपणा जरूर आहे पण अभाव आहे तो राजकीय प्रगल्भतेचा. आणि त्यामुळे मोदी सरकारला संसदेत खऱ्या अर्थाने बौद्धिक पातळीवर धारदार आव्हानच उरलेले नाही.

या पार्श्वभूमीवर खरेच वर उल्लेख केलेल्या सर्व दिग्गज खासदारांची आठवण होते. 1980 च्या दशकापर्यंत विरोधकांची संख्या संसदेत अक्षरशः मुठभरच होती. पण त्या संख्याबळापेक्षा विरोधकांचे बौद्धिक बळ कितीतरी मोठे होते. काँग्रेस पक्षाला पाशवी बहुमत मिळायचे त्या काळात विरोधक तुरळक मतदारसंघात निवडून यायचे. त्या काळात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांच्या समोर प्रचंड ताकतीचे बौद्धिक आव्हान निर्माण करण्याची क्षमता विरोधी खासदारांमध्ये होती. या खासदारांची नुसती नावे जरी घेतली तरी आपल्याला त्यांची बौद्धिक ताकद लक्षात येते डॉ. राम मनोहर लोहिया, पंडित दीनदयाळ उपाध्याय, पिलू मोदी, महावीर त्यागी, मिनू मासानी यांचा यांच्यासारखे एकाचढ एक दिग्गज त्या वेळी संसदेत नेहरूंना घाम फोडत असत. त्यासाठी त्यांना अक्षरशः कायद्याची पुस्तके चाळावी, गुंडाळावी लागायची. संख्येने कमी पण बौद्धिक क्षमता प्रचंड असलेले विरोधक नेहरूं सारख्या पंतप्रधानांना अत्यंत प्रखरतेने घेरुन टाकायचे.



वर उल्लेख केलेल्या सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नेहरू, इंदिरा सरकारची दमछाक व्हायची. उदाहरणच द्यायचे झाले तर १९६१ मध्ये नेहरूंनी अतिशय उघडपणे संसदेत उत्तर दिले होते त्या लडाखच्या प्रदेशात गवताचे पाते देखील उगवत नाही त्या क्षणी काँग्रेसचे सदस्य असलेले आणि काही काळ नेहरू मंत्रिमंडळात काम केलेले वरिष्ठ नेते महावीर जागेवरील आणि आपल्या टाकला कडे बोट दाखवून म्हणाले, मिस्टर प्राईम मिनिस्टर मी टकला आहे आणि तुम्ही टकले आहात. आपल्या डोक्यावर केस उगवत नाही, मग डोके उडवून लावायचे का? नेहरूंना या अचानक झालेल्या हल्ल्याने गप्प बसावे लागले होते.

नेहरूंचे चीन हल्ल्यावरचे उत्तर विरोधी संसद सदस्यांनी खपवून घेतले नव्हतेच, पण सत्ताधारी काँग्रेसच्या महावीर त्यागी यांनी देखील त्यांना एका फटक्यात धडा शिकवला होता. मधू दंडवते यांनी, मी प्राध्यापकांकडून इंग्रजी शिकलो आहे, एअर होस्टेसकडून नव्हे, असे राजीव गांधी यांना सुनावले होते.

अशी बौद्धिक क्षमता बाळगून असणारे मिनू मासानी, पिलू मोदी, मधू दंडवते आज विरोधकांमध्ये नाहीत, हे खरेच पण सत्ताधारी बाकांवर देखील त्यांचा अभावच आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे मोदी सरकारची अनेक बौद्धिक दृष्ट्या कमकुवत असलेली उत्तरे सहज खपली जातात. विरोधकांच्या आक्रस्ताळ्या भूमिकेमुळे दडपली जातात. मोदी सरकार खऱ्या अर्थाने एक्स्पोज होत नाही.

मोदी सरकारला घेरण्याची राहुल गांधी आणि सध्याच्या विरोधकांची ती बौद्धिक क्षमताच नाही. पिलू मोदी, मधू लिमये, मधू दंडवते, ही सत्ताधाऱ्यांना सोडाच सध्याच्या विरोधकांनाही झेपणारी नावे नाहीत. बरे झाले ते सध्या नाहीत, अन्यथा त्यांना सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचाही बौद्धिक दुष्काळ पाहावा लागला असता आणि त्यांना तो बौद्धिकदृष्ट्या झेपला नसता…!!

can opposition afford piloo mody, minu massani, madhu limye, madhu dandawate?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात