भारतात राजस्थानात सापडली सोन्याची खाण; भिलावडा येथे सोन्यासह, तांब्याचे विपूल साठे


वृत्तसंस्था

जयपूर : भारतात राजस्थानामध्ये सोन्याची खाण सापडली आहे. भिलवडा येथे सोन्यासह तांब्याचेही साठे असल्याचे आढळले आहेत. भिलवाडा जिल्ह्यातला कोटडी भागात सोन्याची खाण सापडली आहे. २००८ मध्ये मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशननं कोटडी भागात सर्वेक्षण केले. आता त्याचा अहवाल आला असून जमिनीत सोनं आणि तांब्याचे मोठे साठे असल्याचे उघड झाले आहे. Gold mines found in Rajasthan, India; Abundant reserves of gold, copper at Bhilawada



भारतातील जमिनीत दडलेलं सोनं आतापर्यंत आढळलं नव्हतं. मात्र, भिलवडा येथे जमिनीखाली ६० ते १६० मीटर आतमध्ये हा खजिना दडला आहे. या खाणीत ६०० किलो सोनं आणि २५० टन तांब्याचे साठे असल्याचा अंदाज आहे.

भीलवाडा जिल्ह्यात आशियातील सर्वात मोठ्या दोन खाणी आहेत. जगातील दुसरी आणि आशिया खंडातील सर्वात मोठी जस्ताची खाण जिल्ह्यातल्या आगूचा भागात आहे. आता सोन्याची खाण मिळाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे.

Gold mines found in Rajasthan, India; Abundant reserves of gold, copper at Bhilawada

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात