अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सुत्रधार परमवीरसिंगच नवाब मलिक यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

मुंबई : परमवीरसिंग यांची वक्तव्ये ही राजकारणाने प्रेरीत असून अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सुत्रधार परमवीरसिंगच आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. Paramvir Singh is the mastermind behind the Antilia bomb plant Allegation of Nawab Malik

नवाब मलिक म्हणाले, ”अँटिलिया बॉम्ब प्लांटनंतर मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. एटीएस या प्रकरणाचा तपास करत असताना आणखी सत्य बाहेर येणार होते त्याचवेळी ‘एनआयए’ने (National Investigation Agency) तपास हाती घेतला. त्याचवेळी परमवीरसिंग यांच्या घरी बैठक झाली याचा उल्लेख आहे



कुरकुरे बालाजी यांच्या ईमेलचा उल्लेख आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे तयार करण्यासाठी पाच लाख रुपये देण्यात आले याचाही उल्लेख आहे. असे असताना अडिशनल चार्जशीट दाखल करणार असल्याचे सांगूनही ‘एनआयए’ने चार्जशीट दाखल केले नाही.याचा अर्थ केंद्र सरकारचा परमवीरसिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

परमवीरसिंग यांच्या माध्यमातून खोटे आरोप करण्यात येत असून जो मुख्य सुत्रधार आहे त्याचे वक्तव्य राजकारणाने प्रेरीत आहेत. केंद्र सरकार परमवीरसिंग यांच्या माध्यमातून आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी व अडचणीत आणण्यासाठी कटकारस्थान रचत आहे. त्यांचे हे कटकारस्थान कोर्टात उघड होईल असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचाराला येणार्‍या सर्व नेत्यांची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. त्यामुळे तात्काळ उत्तर प्रदेशच्या डीजीपींना,( Director General of Police)आदेश देऊन त्या सर्व येणाऱ्या स्टार प्रचारकांची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारने घ्यावी असेही नवाब मलिक म्हणाले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सातत्याने साक्षीदार फुटत असल्याची बाब समोर येत आहे ही गंभीर बाब आहे असे मलिक म्हणाले. यानिमित्ताने देशाच्या हितासाठी शहीद होणारे हेमंत करकरे यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर सरकारी वकील आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे कोर्टाने या सर्व बाबीची दखल घ्यावी अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

Paramvir Singh is the mastermind behind the Antilia bomb plant Allegation of Nawab Malik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात