कोणताच पक्ष आपला नाही हे मराठ्यांना समजलं; सर्वपक्षीय आवाहन जरांगे पाटलांनी धुडकावलं!!

प्रतिनिधी

जालना :  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सह सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारसाठी वेळ मागितला. मनोज जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले, पण या सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावून लावले.The Marathas realized that no party was theirs; Jarange Patal’s all-party appeal was dismissed!!

सर्वपक्षीय नेते आतून एकच आहेत आणि ते मराठ्यांना वेड्यात काढत आहेत. त्यामुळे कोणताच पक्ष आपला नाही, हे मराठ्यांना समजले आहे. आम्ही मनात आणले तर पाच मिनिटात त्यांचा आवाज बंद करू, असे जरांगे पाटील म्हणाले.



आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. दरम्यान, राज्यात बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्था आणि मराठा आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीयांचे एकमत झालेले आहे, तर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याबाबतही सर्वपक्षीयांनी आवाहन केले आहे. यावर आता जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

जरांगे म्हणाले, “सरकारला वेळ आता कशासाठी पाहिजे? मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार का? सर्वपक्षीय बैठकीचा तपशील घ्यायची माझी इच्छा नाही. गोरगरीब मराठ्यांकडे लक्ष द्यायचे सोडून, सरकार बैठका घेत आहे. मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्या घडत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल करायचं काम सरकार करतं. त्यामुळे सरकारला सुटी नाही. आरक्षण द्या, आणखी वेळ कशाला पाहिजे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार का?” असा सवाल जरांगेंनी सर्वपक्षीय नेत्यांना केला.

सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन :

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची विस्तृत बैठक झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सरकारचीच नव्हे तर सर्वांचीच भूमिका आहे. आजच्या बैठकीत, मराठा समजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, असा ठराव करण्यात आला. त्याचवेळी, इतर समाजावर अन्याय न करता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, अशीही भूमिका घेण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रक प्रसिद्ध केले त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज (ता. १) सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाची सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी मनोज जरांगे यांच्या प्रामाणिकपणावर आम्हाला विश्वास आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारही प्रमाणिक प्रयत्न करत आहेत. सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. मात्र, मनोज जरांगे पाटलांनी ही विनंती धुडकावली.

The Marathas realized that no party was theirs; Jarange Patal’s all-party appeal was dismissed!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात