दहशतवादी हल्ल्यात हेडकॉन्स्टेबल शहीद, घरात घुसून गोळी झाडली; तीन दिवसांत हल्ल्याची तिसरी घटना

पोलीस निरीक्षक मसूर अली यांच्यावर रविवारी श्रीनगरमध्ये झाला होता हल्ला .

विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर :  बारामुल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गुलाम मोहम्मद डार शहीद झाला आहे. वेलू क्रालपोरा गावात दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून गोळीबार केला.  Head constable martyred in terrorist attack in Jammu and Kashmirs Baramulla

अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गुलाम मोहम्मद डार गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एसडीएच तांगमार्ग येथे नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या डार यांचा मृत्यू झाला.

दहशतवाद्यांनी तीन दिवसांत हल्ल्याची तिसरी घटना घडवली आहे, तर तीन दिवसांत पोलिसांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. पोलीस निरीक्षक मसूर अली यांच्यावर रविवारी श्रीनगरमध्ये हल्ला झाला आणि ते अजूनही रुग्णालयात आहेत.

Head constable martyred in terrorist attack in Jammu and Kashmirs Baramulla

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात