पीयूष गोयल यांच्या फोनवरही आले नोटिफिकेशन, ‘Apple’ला उत्तर द्यावे लागेल – राजीव चंद्रशेखर

Rajeev Chandrasekhar

ॲपल कंपनीने भारतातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच नव्हे, तर तब्बल 150 देशांमध्ये हॅकिंगचा अलर्ट पाठवला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हॅकिंगच्या वादावर केंद्र सरकार सक्रिय झाले आहे. याबाबत Appleला उत्तर द्यावे लागेल, असे आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या फोनवरही तसे नोटिफिकेशन आल्याचे त्यांनी सांगितले. Notification came on Piyush Goyals phone too Apple has to answer  Rajeev Chandrasekhar

दरम्यान, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी Appleच्या सूचनेनंतर फोन हॅकिंगबाबत विरोधकांची चिंता फेटाळून लावली. “हा निवडणुकीचा हंगाम आहे आणि हे लोक सर्व प्रकारच्या गोष्टी काढतील” असे ते म्हणाले.

राजीव चंद्रशेखर म्हणाले की, पक्षाचे वरिष्ठ सहकारी पीयूष गोयल यांनाही असेच नोटिफिकेशन मिळाले असून अॅपलला सरकारच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

ॲपल कंपनीचे काही आयफोन्स सरकारी पातळीवरून हॅक होत असल्याचा अलर्ट कंपनीने दिला असल्याचा दावा राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी केला. मात्र हा दावा केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

ॲपल कंपनीने भारतातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच नव्हे, तर तब्बल 150 देशांमध्ये हॅकिंगचा अलर्ट पाठवला आहे. पण या देशात स्वतःहून “सक्तीचे विरोधक” बनलेल्यांनी सकाळी उठल्यावर मोदी सरकारवर टीका करण्याचाच मक्ता घेतला आहे. त्यामुळे कोणताही मुद्दा हातात असो किंवा नसो, ते टीकाच करत राहतात आणि कुठलाही मुद्दा सापडला नाही की सरकारवर हेरगिरीचा आरोप करतात, असे शरसंधान अश्विनी कुमार वैष्णव यांनी साधले.

Notification came on Piyush Goyals phone too Apple has to answer  Rajeev Chandrasekhar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात