मोदींनी शेख हसीनासोबत केले तीन प्रकल्पांचे उद्घाटन, जाणून घ्या काय होणार फायदे?

 मागील ९ वर्षात आपण एकत्र जे काम केले आहे ते काम मागील काही दशकातही झाले नव्हते.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन भारतीय-सहाय्यित विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन केले. हे तीन प्रकल्प म्हणजे अखौरा-अगरतळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक, खुलना-मोंगला पोर्ट रेल लाइन आणि बांगलादेशातील रामपाल येथील मैत्री सुपर थर्मल पॉवर प्लांटचे युनिट-II. PM Modi inaugurated three projects with Sheikh Hasina

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या 9 वर्षांत आमचा परस्पर व्यापार जवळपास तिपटीने वाढला आहे. 9 वर्षांच्या या प्रवासात आज अखौरा-अगरताळा रेल्वे लिंकचे उद्घाटन हा देखील एक ऐतिहासिक क्षण आहे.

याशिवाय पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या ईशान्येकडील राज्यांशी बांगलादेशी ही पहिला लिंक आहे. ईशान्य भारतातील राज्ये आणि बांगलादेशची बंदरे ही या लिंकद्वारे जोडली जातील. खुलना बांगला रेल्वे लाईनच्या बांधकामामुळे बांगलादेशचे मोंगला बंदर आता ढाका आणि कोलकाता व्यापार केंद्राशी रेल्वेमार्गे जोडले गेले आहे. आज आपण मैत्री औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या इनिंगचे उद्घाटन केले याचा आनंद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत-बांगलादेश सहकार्याचे यश साजरे करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो ही आनंदाची बाब आहे. आमचे संबंध सतत नवीन उंची गाठत आहेत. गेल्या 9 वर्षात आपण एकत्र जे काम केले आहे ते काम मागील काही दशकातही झाले नव्हते.

PM Modi inaugurated three projects with Sheikh Hasina

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात