इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम बियारी ठार!

७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात होता सहभागी

विशेष प्रतिनिधी

गाझामधील सर्वात मोठ्या निर्वासित छावणीवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर गाझामधील लोकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर इस्रायली लष्कराने दावा केला की, ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात सहभागी असलेला हमास कमांडरही निर्वासित छावणीत मारला गेला. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉनरिक्स यांनी म्हटले आहे की, गाझाच्या जबलिया निर्वासित छावणीवर झालेल्या हल्ल्यात इस्रायलचे लक्ष्य हमास कमांडर इब्राहिम बियारी होता. Senior Hamas commander Ibrahim Biari was killed in an Israeli attack

या हल्ल्यात भूमिगत बोगद्यांमध्ये हमासचे ‘अनेक कमांडर’ मारले गेल्याचा दावा जोनाथन कॉनरिक्स यांनी केला आहे. बियारी या बोगद्यातूनच ऑपरेशन करत असे. इस्त्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांनी भूमिगत बोगद्यांच्या नेटवर्कला लक्ष्य केले होते, ज्यामुळे जवळपासच्या अनेक इमारती कोसळल्या होत्या, हे नुकसान टाळता आले नसते.

आयडीएफने सांगितले की ते हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या अहवालांवर लक्ष ठेवून आहेत. मृतांचा स्पष्ट आकडा अद्याप समोर आलेला नाही. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्यातील मृतांची संख्या 50 वर ठेवली आहे. पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीने सांगितले की या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये 150 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

Senior Hamas commander Ibrahim Biari was killed in an Israeli attack

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात