विशेष प्रतिनिधी
मुंबई : MSRTC Ashadhi Wari आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठू नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली असून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. याच दरम्यान, वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी एसटी महामंडळाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. आषाढी वारीला पंढरपूरला जाण्यासाठी जर ४० वारकरी एकत्र आले, तर महामंडळाकडून त्यांना थेट विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपुरात ही मोठी घोषणा केली.MSRTC Ashadhi Wari
पंढरपुरातील एसटी बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आणि महामंडळाच्या सर्व विभागांची आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी आषाढीच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.MSRTC Ashadhi Wari
५,५०० गाड्या, ११ हजार चालक-वाहक
वारकऱ्यांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने यंदा चोख व्यवस्था केली आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपुरात भाविकांची गर्दी विभागण्यासाठी चार तात्पुरती बस स्थानके कार्यान्वित करण्यात आली आहेत. राज्यभरातून वारकऱ्यांना आणण्यासाठी आणि सुखरूप सोडण्यासाठी ५ हजार ५०० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ११ हजार चालक आणि वाहक अहोरात्र कार्यरत असणार आहेत. यंदाच्या वारीमध्ये प्रथमच एक नवा प्रयोग केला जात आहे. वारीच्या काळात उत्कृष्ट आणि प्रामाणिक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे विशेष ‘प्रगती पुस्तक’ (परफॉर्मन्स रेकॉर्ड) तयार केले जाणार आहे.MSRTC Ashadhi Wari
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठू नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली असून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. याच दरम्यान, वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी एसटी महामंडळाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे. आषाढी वारीला पंढरपूरला जाण्यासाठी जर ४० वारकरी एकत्र आले, तर महामंडळाकडून त्यांना थेट विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपुरात ही मोठी घोषणा केली.
पंढरपुरातील एसटी बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आणि महामंडळाच्या सर्व विभागांची आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी आषाढीच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.
वारकऱ्यांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने यंदा चोख व्यवस्था केली आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपुरात भाविकांची गर्दी विभागण्यासाठी चार तात्पुरती बस स्थानके कार्यान्वित करण्यात आली आहेत. राज्यभरातून वारकऱ्यांना आणण्यासाठी आणि सुखरूप सोडण्यासाठी ५ हजार ५०० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ११ हजार चालक आणि वाहक अहोरात्र कार्यरत असणार आहेत. यंदाच्या वारीमध्ये प्रथमच एक नवा प्रयोग केला जात आहे. वारीच्या काळात उत्कृष्ट आणि प्रामाणिक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे विशेष ‘प्रगती पुस्तक’ (परफॉर्मन्स रेकॉर्ड) तयार केले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App