Kalyan West : कल्याणमध्ये 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; मलब्याचा ढीग थेट रस्त्यावर, जीव मुठीत धरून नागरिक खिडकीतून पळाले

Kalyan West

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Kalyan West कल्याण पश्चिम परिसरातून एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुनर्विकासासाठी पाडकाम सुरू असलेली एक ४ ते ५ मजली भलीमोठी इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी जागेवरच कोसळली. या दुर्घटनेचे दृश्य अत्यंत चित्तथरारक असून, इमारत कोसळतानाचा थेट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सुदैवाने, या भयानक दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.Kalyan West

यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही घटना कल्याण पश्चिमेकडील घोलप नगर परिसरात दुपारी २ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास घडली. येथील ‘विनायक दर्शन’ नावाच्या इमारतीचे रि-डेव्हलपमेंटसाठी टप्प्याटप्प्याने पाडकाम सुरू होते. दुपारच्या वेळी काम सुरू असतानाच अचानक इमारतीचा एक मोठा भाग थेट भर रस्त्यावर कोसळला.Kalyan West



जीव मुठीत धरून नागरिक खिडकीतून पळाले!

या इमारतीमध्ये सध्या कोणीही वास्तव्यास नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच, इमारतीचा प्रचंड मलबा जेव्हा रस्त्यावर आला, तेव्हा सुदैवाने तिथून कोणतेही वाहन किंवा पादचारी जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

इमारत कोसळत असल्याचा भयानक आवाज होताच, बाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले. परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. शेजारी राहणाऱ्या काही नागरिकांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवण्यासाठी थेट आपल्या घराच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा बचाव केला.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; विकासकावर कारवाई होणार का?

इमारत कोसळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. पाडकामाच्या ठिकाणी विकासकाकडून पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि कोणतीही संरक्षणात्मक जाळी किंवा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे.

या घटनेनंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अधिकारी आणि विकासक यांच्यात पाडकामाच्या कारवाईबाबत योग्य समन्वय होता की नव्हता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भयावह घटनेत जर कोणाचा जीव गेला असता, तर त्याला जबाबदार कोण राहिले असते? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकरणी पोलीस आणि पालिका प्रशासन दोषींवर काय कायदेशीर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chilling Video: Multi-Storey ‘Vinayak Darshan’ Building Collapses in Kalyan West

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात